News

सध्या विजेला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात यावा यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या प्रोत्साहनपर योजना आखण्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Updated on 20 May, 2022 3:13 PM IST

 सध्या विजेला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात यावा यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या  प्रोत्साहनपर योजना आखण्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

कारण विजेचा खर्च हा बऱ्याच प्रमाणात परवडणार नाही आणि त्यातच विजेच्या टंचाईमुळे बऱ्याचदा विजेच्या संकटांना सामोरे जावे लागते. तसेच ऊर्जेसाठी भविष्यकाळात सौर ऊर्जा शिवाय पर्याय नाही. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर  सौरऊर्जेचा पर्याय निश्चित सोयीचे ठरतो. परंतु जसे काही गोष्टींचे फायदे असतात तसे काही कमजोरी देखील असतात. 

तसेच सौर ऊर्जा ची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ती साठवून ठेवता येत नसल्याने रात्री काय करायचे? हा सगळ्यात मोठा प्रश्न सौर ऊर्जेच्या बाबतीत पुढे येतो. परंतु आता या प्रश्नावर देखील ऑस्ट्रेलियामधील अभियंत्यांच्या एका टीमने उपाय शोधून काढला असून आता रात्री देखील सौर ऊर्जेपासून वीज तयार करून वापरता येऊ शकणारआहे.

रात्री सौर ऊर्जेपासून वीज तयार करणे हे ऐकायला देखीलविचित्र आणि मनाला न पटणारे आहे.परंतु यामध्ये असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये पारंपारिक सोलर पॅनेलच्याउलट प्रक्रियेने वीज निर्माण करता येऊ शकते. यामध्ये सौर पॅनल च्या विविध प्रकारच्या सामग्री तून रात्रीच्या वेळी उष्णता बाहेर पडले की वीज निर्माण होते. ऑस्ट्रेलियातील अभियंत्यांच्या टीमने हे अमलात आणून दाखवले आहेत.

. हेच तंत्र रात्री काळोखात दिसण्यासाठी जे गॉगल वापरले जातात त्यामध्येवापरले जाते. आतापर्यंत विचार केला तर या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रोटोटाइपने फारच कमी ऊर्जा निर्माण केली असून लवकरच पर्यायी ऊर्जा स्त्रोत म्हणून विकसित होण्यास वेळ लागू शकतो. परंतु हे तंत्रज्ञान सध्याच्या फोटोहोल्टेईक्स तंत्रज्ञानाशी जोडले गेले तर ते दिवसभरात गरम राहिलेला सोलर पॅनल रात्रीच्यावेळी थंड पडल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून ऊर्जा निर्मिती करू शकतो.

 यंत्रणा कशी काम करते?

 फोटोहोल्टेइक प्रक्रियेमध्ये सूर्यप्रकाश कृत्रिम रीत्या थेट विजेमध्ये रूपांतर केला जातो. सौर ऊर्जा वापरण्याचा हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे.  जेव्हा कोणताही पदार्थातील अनु मधून उष्णता वाहते तेव्हा इलेक्ट्रॉन इन्फ्रारेड लहरींच्या स्वरूपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करू लागतात.या प्रक्रियेतून अत्यंत कमी क्षमतेने संथ वीजनिर्मिती करता येते.यामध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह एका दिशेने असणारे उपकरण आवश्यक आहे. याला डायोड म्हणतात.

यामध्ये उष्णता गमावल्यावर इलेक्ट्रॉन खाली जमा होतात. संशोधकांनी मरकरी कॅडमियम टॅल्युराइड पासून बनवलेल्या डायोडचा चा वापर केला जातो इन्फ्रारेड प्रकाश पकडण्यासाठी वापरला जातो. उर्जेचा स्त्रोत म्हणून याचा वापर प्रभावीपणे कसा करता येईल हे आतापर्यंत माहित नव्हते. एमसिटी फोटोहॉल्टईक डिटेक्टरने 20 अंश उष्णते पर्यंत प्रती चौरस मीटर 2.26 मिलीवेट घनतेची ऊर्जा उत्सर्जित केले. यासाठी कॉफीबनवण्या इतपत पाणी उकळता येत नाही.

सध्याचे थरमो रेडिएटिव्ह डायोड खूप कमी उर्जा देत आहेत. परंतु हे तंत्रज्ञान भविष्यात अधिक कार्यक्षम बनवता येईल पण या तंत्रज्ञानाचा शोध घेणे खरे आव्हान होते.(स्रोत- लोकसत्ता)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:भारतातील सर्वात जास्त खप होणाऱ्या हिरो मोटोकॉर्पने ब्लूटूथ आणि यूएसबी चार्जरने सुसज्ज नवीन बाइक लॉन्च केली, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

नक्की वाचा:Corona Update: भारतामध्ये 'या' ठिकाणी सापडला Omicron B4 चा पहिला रुग्ण, जाणून घेऊ या स्ट्रेन बद्दल माहिती

नक्की वाचा:Monsoon Updates: आला आला रे आला मान्सून आला ! कोकणातील मान्सूनची तारीख ठरली..!

English Summary: now solar energy creat at night that technique serch by australian engineers
Published on: 20 May 2022, 03:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)