शेतकऱ्यांना बाजारभावापासून ते जमिनीतील उताऱ्यापर्यंत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. असे असताना आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. राज्यात सातबारा उतार्यात एकसमानता आणल्यानंतर आता या उतार्यावर क्यूआर कोड देण्यात येणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करताच संबंधित सर्व्हेनंबरचे फेरफार उतारे, जमिनीचा नकाशा, जमिनीचे नेमके स्थान कोठे आहे, याची माहिती मिळणार आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांनी क्यूआर कोड स्कॅन करताच संबंधित सर्व्हेनंबरचे फेरफार उतारे, जमिनीचा नकाशा, जमिनीचे नेमके स्थान कोठे आहे, याची माहिती लगेच मिळणार आहे. तसेच यामुळे जमिनीची मोजणी अचूक होणार आहे. याच कारणामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात येत आहे. काळाच्या ओघात हा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाकरून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यानंतर क्यूआर कोड दिला जाईल. अनेकदा शेतकऱ्यांची जमिनीबाबत मोठी फसवणूक केली जाते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. सातबारा स्कॅन करताच शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळणार आहे.
शरद पवारांना मोठा धक्का! सरकार बदलताच पवार अध्यक्ष असलेली परिषद बरखास्त
यामुळे आता घरबसल्या शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे. यामध्ये मोजणी करताना प्रत्येक सर्व्हे नंबरचे को-ऑर्डिनेट निश्चित करण्यात येईल. ते निश्चित केल्यानंतर सातबारा उतार्यावर क्यूआर कोड प्रिंट करण्यात येईल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..
रिकाम्या पोटी नारळपाणी पिल्याने शरीरावर होतात हे परिणाम, जाणून घ्या, होईल फायदा...
भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...
Published on: 05 July 2022, 03:23 IST