कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ खूप महत्त्वपूर्ण असून कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळीचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. कारण जेव्हा बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर कमी असतात तेव्हा कांदा साठवण्याकडे शेतकरी भर देतात व चाळीत साठवलेला कांदा बराच काळपर्यंत टिकतो. परंतु कांदाचाळ बांधकामास साठी लागणाऱ्या खर्चाचा विचार केला तर ते प्रतेक शेतकऱ्यांना अत्याधुनिक कांदाचाळ उभारणी आर्थिक दृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे शासनाकडून कांदा चाळीसाठी अनुदान दिले जाते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान
या अनुदानामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कांदाचाळी उभारणीसाठी आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे. परंतु सध्या परिस्थितीत कांदा चाळीसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा विचार केला तर ते पाच ते पंचवीस मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेल्या कांदा चाळीसाठी देय आहे. परंतु आता ही साठवण क्षमतेत असलेली मर्यादांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीला मिळणार अनुदान
सध्या पाच ते पंचवीस मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेल्या कांदा चाळीसाठी शेतकरी बांधवांना सरकारकडून अनुदान दिले जाते. परंतु आता शेतकरी बांधवांना जर 50 मेट्रिक टन क्षमतेची कांदा चाळ बांधायची असेल तर त्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नक्की वाचा:रोपवाटिका अनुदानात वाढ! राज्य सरकारकडून मिळणार पावणे तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान
यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीचा विचार केला तर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ बनवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
परंतु आतापर्यंत कांदा चाळीसाठी दिले जाणारे अनुदान 5 ते 25 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी दिले जात होते. परंतु आता या मर्यादेमध्ये वाढ करण्यात येऊन ती 50 मेट्रिक टन क्षमतेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे आता शेतकरी बंधूंना 50 मेट्रिक टन क्षमतेची कांदा चाळ उभारण्यासाठी देखील अनुदान उपलब्ध होणार आहे व त्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण निर्देश फलोत्पादन विभागाच्या बैठकीत मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत.त्यासोबतच लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
Published on: 17 October 2022, 04:15 IST