अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. तर किडींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग हतबल झाले आहेत. मात्र संकटांची मालिका इथेच थांबत नाही. जोमाने वाढणाऱ्या या गवताच्या नव्या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. 'केना' नावाच्या गवतामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेतकरी 'केना' गवतामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. यावर्षी शहादा तालुक्यातील पूर्व भागात पिकांमध्ये तणाच्या स्वरूपात 'केना' गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पिकांपेक्षा तणाचे प्रमाण वाढल्याने पिकांच्या वाढीवर याचा परिणाम होऊ लागला आहे.
मात्र यावर्षी वाढलेल्या या नव्या प्रकारामुळे शेतकरीही विचारात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाने उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करावे अशी मागणी केली आहे. यातून या परिसरातील शेतकऱ्यांना तण निर्मूलन करण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'केना' हे लांब पानांचे गवत असून या परिसरात हे यापूर्वी कधीही आढळले नव्हते.
Fertilizers: शेतकरी मित्रांनो पिकांना खत देताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या; होईल फायदाच फायदा
शेतकऱ्यांनी या गवताच्या निर्मूलनाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी केली आहे. या वाढत्या तणाचे कारण काय? आणि कोणत्या कारणांमुळे हे तण आले आहे? याची शेतकऱ्यांनाही कल्पना नाही. मात्र शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गवताचे बी रासायनिक खतांमध्ये आले असावे. आता कृषी विभाग यावर काय उपाययोजना आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: मिश्र खतांचे उत्पादन बंद होणार? राज्यातील आठ खत उत्पादकांना नोटीसा
Common wealth Games: शेतकरी मुजूराच्या मुलाची गोल्डन कामगिरी; राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी थोपटली पाठ
Published on: 02 August 2022, 04:52 IST