News

शेती संबंधी कामे जलद गतीने आणि सोयीस्कर व्हावी यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना तसेच उपक्रम राबवत असते. आता सर्वकाही डिजिटल होऊ लागले आहे त्यात शेती विभाग कसा मागे राहील. कृषी क्षेत्रातसुद्धा काळानुसार बदल केले जात आहे. आतापर्यंत आपण ई-पीक पाहणी तसेच ऑनलाईन सातबारा उतारा यांसारख्या उपक्रमांबद्दल ऐकले असेल.

Updated on 26 June, 2022 3:05 PM IST

शेती संबंधी कामे जलद गतीने आणि सोयीस्कर व्हावी यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना तसेच उपक्रम राबवत असते. आता सर्वकाही डिजिटल होऊ लागले आहे त्यात शेती विभाग कसा मागे राहील. कृषी क्षेत्रातसुद्धा काळानुसार बदल केले जात आहे. आतापर्यंत आपण ई-पीक पाहणी तसेच ऑनलाईन सातबारा उतारा यांसारख्या उपक्रमांबद्दल ऐकले असेल. मात्र आता सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अजून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आता शेतकऱ्यांना 'ई-चावडी' उपक्रमाच्या माध्यमातून शेतजमिनीसह, अकृष जमिनींचा महसूल भरता येणार आहे. यासाठी लागणाऱ्या ई-पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात आहे. 1 ऑगस्टपासून राज्यातील शेतकऱ्यांना 'ई-चावडी' या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. सुरुवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी काही गावांची निवडदेखील करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतसारा नियमित अदा होणार तसेच कारभारातही तत्परता येणार असल्याचे सांगितले जात आहे.

'ई-चावडी' अंतर्गत मिळणारी सेवा
महसूल विभागाच्या माध्यमातून जमिनीच्या प्रकारानुसार बिन शेतीचा दंड, शेतसारा, नजर अंदाजे रक्कम इत्यादी प्रकारचे कर तसेच गाव नमुना क्रमांक 17 प्रमाणे वसुल केला जातो. या प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या संगणीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. संगणीकरणाचे काम तलाठ्यांच्या लक्षात येईल असे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. तसेच शेतसारा वसुलीसाठी सर्व विभागातील निवडक जिल्हे आणि त्यामधील गावे यांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे.

4

जाणून घ्या शेतसारा भरण्याची प्रक्रिया
तलाठी हाच शेतसारा शेतकऱ्यांकडून भरुन घेण्यासाठी मध्यस्ती राहणार आहे. आधी तलाठ्यांकडून खातेदाराला नोटीस पाठवली जाईल. त्यानंतर नागरिकांची ती नोटीस ई-चावडी प्रकल्पांमधील तलाठी कार्यालयात दिसेल. या नोटीसवर क्लिक करुन शेतकऱ्यांना रक्कम अदा करता येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतसारा भरलेल्या रकमेची पावतीही तिथेच मिळेल. आणि पुढे तलाठी हाच जमा झालेला शेतसारा महसूल प्रशासनाकडे जमा करणार.

महत्वाच्या बातम्या:
137.28 लाख टन, साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी
पावसा आता तरी पड रे! पावसाअभावी तब्बल २७ लाख हेक्टरमध्ये पेरणी थबकली

English Summary: Now 'e-chawdi' will be a boon for farmers; Big decision of the state government
Published on: 26 June 2022, 03:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)