News

हवेली तालुक्यातील अनेक दिवसांपासून बंद असलेला यशवंत कारखाना कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना कारखान्याच्या प्रश्नात पूर्ण मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीत दिले आहेत.

Updated on 22 May, 2023 11:52 AM IST

हवेली तालुक्यातील अनेक दिवसांपासून बंद असलेला यशवंत कारखाना कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना कारखान्याच्या प्रश्नात पूर्ण मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीत दिले आहेत.

त्यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून कारखाना सुरू होण्याच्या प्रयत्नांचा विषय बाजार समितीच्या अजेंड्यावर येणार आहे. यामुळे आता हा कारखाना कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा कारखाना लवकर सुरू व्हावा अशी शेतकऱ्याची इच्छा आहे.

हवेली बाजार समितीत यश मिळाल्याने आता या बाजार समितीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे दौऱ्यात भेट घेतली आहे. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी या यशाचे कौतुक करुन बाजार समितीसह थेऊर यशवंत कारखान्यात सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.

मोठी बातमी! बाबाराजे देशमुखांना पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती आली समोर..

बाजार समितीच्या सव्वाशे कोटींच्या ठेवीतून कारखान्याला मदत होते काय ? याबाबत चर्चा सुरू आहे. कारखान्याची जमिन खरेदी करण्याचा मुद्दा समितीच्या अजेंडावर येईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश..

यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या परवानगी देऊ शकते याबाबतची चर्चा आहे. त्यामुळे कारखाना निवडणूकीच्या तोंडावर आघाडी पॅटर्न सभासदांपुढे हा मुद्दा घेऊन निवडणूकीला समोरे जाण्याची तयारी सुरु झाली आहे.

राज्यात लम्पीचीही दुसरी लाट! शेतकरी चिंतेत, लसीकरण करून घेण्याचे आवाह
कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश..
कारखान्यांची धुराडी बंद होऊन 3 महिने झाले FRP मात्र मिळेना, शेतकरी अडचणीत..

English Summary: Now Devendra Fadnavis in the field for Yashwant Karkhana, will promise full...
Published on: 22 May 2023, 11:52 IST