News

सध्या आधुनिकतेच्या काळात अनेक बदल होत चालले आहेत. यामुळे देश अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे. रोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. असे असताना आता प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच भारतीय टपाल विभागाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने पार्सल पोहोचवले आहे. यामुळे हे एक मोठे यश मानले जात आहे.

Updated on 31 May, 2022 3:33 PM IST

सध्या आधुनिकतेच्या काळात अनेक बदल होत चालले आहेत. यामुळे देश अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे. रोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. असे असताना आता प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच भारतीय टपाल विभागाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने पार्सल पोहोचवले आहे. यामुळे हे एक मोठे यश मानले जात आहे. या ड्रोनने २५ मिनिटांत ४६ किलोमीटरचे अंतर कापले आहे. यामुळे येणाऱ्या काळात हे प्रयोग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.

हे पार्सल कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यातील हबे गावातून भचाऊ तालुक्यातील नेर गावात पोहोचवण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने, भारतीय टपाल विभागाने देशात प्रथमच ड्रोनच्या सहाय्याने कच्छ, गुजरातमध्ये पार्सल वितरणाची यशस्वी प्रायोगिक चाचणी घेतली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, ड्रोनला सुरुवातीच्या ठिकाणापासून ४६ किमी अंतरावर असलेल्या गंतव्यस्थानावर पार्सल वितरीत करण्यासाठी २५ मिनिटे लागली.

केंद्रीयमंत्री राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले की, या पार्सलमध्ये वैद्यकीय संबंधांचे साहित्य होते. पायलट प्रोजेक्टने विशेषत: ड्रोनद्वारे पार्सल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याच्या खर्चाचा अभ्यास केला गेला असून यासोबतच पार्सल पोहोचवण्याच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमधील समन्वयाचीही चाचणी या काळात झाली. यामुळे हे फायदेशीर ठरले आहे.

म्हैस फक्त त्यालाच दूध काढून देते!! मग काय कपाळावर बाशिंग आणि नवरदेव काढतोय म्हशीचं दूध

यासोबतच पार्सल पोहोचवण्याच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमधील समन्वयाचीही चाचणी या काळात झाली. यामुळे हे फायदेशीर ठरले आहे. चौहान यांनी शनिवारी ट्विट केले की देशात ड्रोन महोत्सव २०२२ साजरा होत असताना, टपाल विभागाने गुजरातमधील कच्छमध्ये ड्रोनद्वारे पार्सल पाठवण्याचे यशस्वीपणे प्रयोग केले.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो कृषिपंपावर लक्ष ठेवा!! एका रात्रीतून 10 कृषिपंप चोरीला
मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना; भांडवल खर्चात होणार वाढ
घरात बसुन बांधावरची परिस्थिती कळेल का? जलजीवन मिशनबाबत धक्कादायक वास्तव आले समोर

English Summary: Now delivery goods drones, first experiment country was successful
Published on: 31 May 2022, 03:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)