अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी 'सिबिल स्कोअर'चे निकष लावू नयेत. तसे 'आरबीआय'चेही निर्देश आहेत.
पीककर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक झाल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे आता बँक याबाबत काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध झाले पाहिजे. बँकांनी सिबिल स्कोअर मागता कामा नये. काही बँकांनी विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे कर्जखात्यात टाकल्याच्या तक्रारी आहेत.
असा प्रकार घडता कामा नये. त्यावर कारवाई व्हावी. जलयुक्त शिवार योजनेचे काम झालेल्या ठिकाणी कमी पर्जन्यमान असतानाही संरक्षित सिंचन मिळून पिकांची उत्पादकता राखली गेली. त्यामुळे पर्जन्यमानाची अनिश्चितता लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. ही कामे युद्धस्तरावर राबवून मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत.
मे महिना आहे खुपच उष्ण, पशुधनाची घ्या अशी काळजी..
'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल. जिल्ह्यात 'स्कायमेट'ची 86 केंद्रे कार्यान्वित आहेत.
शासनाच्या दृष्टीने दारू किती महत्वाचीय माहितेय का? सरकारची तिजोरी फुल झालीय, विक्रीत 25 % वाढ
नवी महसूल मंडळांतही ती कार्यान्वित करावीत. पावसाविषयीचे अंदाज, माहिती खेडोपाडी सर्वदूर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार किरण सरनाईक आदी उपस्थित होते.
यावर्षीचा पाऊसकाळ कसा असणार? जाणून घ्या, भारतीय हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती...
शेतकऱ्यांना केवळ 1 रूपयात मिळणार पीकविमा, जाणून घ्या...
शेतकऱ्यांनो बजारात आलीत बनावट खते, अशा प्रकारे ओळख खरी खते..
Published on: 10 May 2023, 12:46 IST