यंदा ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून ऊस तोडणी सुरु आहे. तरी आणखी ९० लाख टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. आता पावसाळ्यापर्यंत उसाचे गाळप सुरू राहणार आहे. अंतिम टप्प्यात परराज्यातूनही ऊसतोड यंत्रे मागवली जाणार आहेत. उसाचे क्षेत्र वाढल्याने यंदा गाळप आणि साखरेचे उत्पादन विक्रमी होणार आहे.
परराज्यातून येणार तोडणी यंत्र
साखर उत्पादन आणि ऊस गाळप या दोन्ही क्षेत्रात महाराष्ट्र सध्या देशात आघाडीवर आहे. असे असतानाही अतिरिक्त उसाची समस्या महाराष्ट्रातही आहे. आता यावर उपाय म्हणून कर्नाटकातूनही ऊस तोडणी यंत्र आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
कर्नाटकातील साखर कारखान्यांची यंत्रणा ताब्यात घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि आता कर्नाटकातील यंत्रणा कामाला लागल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांसाठीचे भारनियमन थांबवा; नाहीतर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा
पावसाळ्यापर्यंत साखर कारखानदारी सुरू राहण्याची शक्यता आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात ९० लाख टन उसाचे गाळप बाकी आहे. उसाची सध्याची स्थिती विक्रमी क्षेत्र आणि विक्रमी उत्पादन अशीच आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
जनावरांचा चारा महागणार; ज्वारी पेक्षा कडब्याला मागणी
Prickly Pear : निवडुंगाची लागवड करा; आणि मिळवा लाखोंचा नफा
Published on: 14 April 2022, 02:30 IST