News

गेल्या काही दिवसांपासून राजकारण अनेक घडामोडी घडत आहेत. तसेच अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. असे असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar ), विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

Updated on 09 August, 2022 8:39 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राजकारण अनेक घडामोडी घडत आहेत. तसेच अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. असे असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar), विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, लवासा प्रकरणी (Lavasa case) सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश या नोटीसीमधून न्यायालायने दिले आहेत. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी नाशिकचे नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती.

यावर सुनावणी झाली असून लवासा हे हिल स्टेशन म्हणून विकसित करण्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावाचा परिणाम झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते. असे असताना मात्र प्रकल्पाचे हक्क तिसऱ्या पक्षाला देण्यात आलेले आहेत, आणि प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यास खूपच विलंब झाला आहे, असे स्पष्ट केले गेले होते.

साईबाबांचे दर्शन घेऊन मोठा नेता मुंबईला रवाना, आता लाल दिवा घेऊनच येणार?

तसेच खंडपीठाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. या निर्णयाला याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये न्यायालयाने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना या प्रकल्पात स्वारस्य होतं असे न्यायालयाने अधोरेखीत केले होते.

IMD Alert : पुढील ३ दिवस या राज्यांमध्ये धो धो कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

दरम्यान, नानासाहेब जाधव यांनी याबाबत सर्वोच्य न्यायालयात दाद मागितली. न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सहा आठवड्यात याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर! देशातील या भागात मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल; जाणून घ्या...
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोने मिळतंय 4000 रुपयांनी स्वस्त...

English Summary: Notice to Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule
Published on: 09 August 2022, 08:39 IST