गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण होत आहे. याचे कारण ठरत आहे, कर्नाटकमधील अलमट्टी धरण. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर येऊन मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता राज्यातील पूरनियंत्रणासाठी अलमट्टीतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. यामुळे आता पावसाळ्यात काय होणार हे काहीच दिवसांमध्ये समजेल.
महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकार्यांची पूरनियंत्रणाबाबत एक बैठक झाली. यामध्ये अलमट्टी धरणातील पाणीपातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय झाला आहे. या काळात पाऊस जास्त पडतो. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
या बैठकीत जीवित व वित्त हानी टाळून प्रभावी पूरनियंत्रणाच्या दृष्टीने कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये दररोज जलशास्त्रीय माहितीची देवाण-घेवाण करण्याचे ठरले आहे. कृष्णाखोरे पूरनियंत्रण कक्ष, सांगली व अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांची अलमट्टी धरणावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय झाला आहे.
शेतकऱ्याच्या मुळावर कोण उठलय? युरियाचे पाणी टाकल्याने चाळीतील कांदा नासला
अशा प्रकारे नियोजन झाल्यास याचा अधिक सक्षमपणे करुन कृष्णा उपखोर्यातील सर्व यंत्रणामध्ये समन्वय साधून प्रभावी पूर नियंत्रण करता येईल, असा विश्वास या बैठकीत अनेकांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता यावर्षीच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी यामुळे मोठे हाल झाले होते.
महत्वाच्या बातम्या;
एकीचे बळ! मल्चिंग पेपरचे गाव, आधी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख, आता झाले बागायती
सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा! पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार, आता मिळणार ४ लाख..
शेतकऱ्यांना वीज बिल माफी!! अर्थसंकल्पात योगी सरकारची मोठी घोषणा..
Published on: 27 May 2022, 12:31 IST