News

सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. आता केंद्रीय मंत्री वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेने शेतकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे. ही योजना शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना फायदेमंद ठरणार आहे.

Updated on 13 July, 2022 3:36 PM IST

सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. आता केंद्रीय मंत्री वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेने शेतकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे. ही योजना शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना फायदेमंद ठरणार आहे.

नितीन गडकरी यांनी काल मंगळवारी (13 जुलै) रोजी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात रस्ते बांधणीशी संबंधित प्रकल्पासाठी सरकार लवकरच भांडवली बाजारातून पैसे गोळा करेल अशी घोषणा केली आहे. या योजणेचा फायदा असा की, आता देशातील रस्ते विदेशी पैशाने नव्हे तर तुमच्या पैशाने तयार होतील आणि त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल.

नितीन गडकरी यांनी कालच्या कार्यक्रमात सांगितले की सरकार लवकरच लघु गुंतवणूकदार योजना आणणार आहे. यामध्ये सामान्य माणूस एक ते दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकणार असून त्याला त्याच्या गुंतवणुकीवर 8 टक्के परतावा दिला जाणार आहे. या योजनेमधून सर्वसामान्य लोकांना नक्कीच फायदा होणार आहे.

हे ही वाचा: शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी करा फक्त 'हे' काम; लाखों रुपयांनी वाढणार उत्पन्न..

यावेळी नितीन गडकरी म्हणाले “जगभरातील मंदीच्या भीतीने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी पैसा उभा करण्यात कोणतीही अडचण नाही. आता मी भांडवली बाजाराकडे वळणार आहे. मला आर्थिक संसाधने उभारण्यात कोणतीही अडचण नाही. अशाप्रकारे बाजारातून रस्ते प्रकल्पांसाठी मोठी रक्कम उपलब्ध होणार आहे”.

हे ही वाचा: कामठी सोसायटीच्या चेअरमन पदी गणेश आरडे यांची निवड

पुढे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) भांडवली खर्च निधीला धोका ठरतील का? असा प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले की, वित्त मंत्रालय या समस्येकडे लक्ष देईल. परंतु तेलाच्या किमती वाढल्यास सेस कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हे ही वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; लाभार्थ्यांना होणार फायदाच फायदा..

English Summary: Nitin Gadkari stated the master plan
Published on: 13 July 2022, 03:36 IST