News

सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून आता विरोधक त्यांना घेरण्याची तयारी करत आहेत. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला.

Updated on 25 August, 2022 12:41 PM IST

सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून आता विरोधक त्यांना घेरण्याची तयारी करत आहेत. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला.

यामुळे एकच खळबळ उडाली. आतापर्यंत घोषणा देऊन निषेध केला जात होता. आता मात्र ही घटना समोर आल्यानंतर आता मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि सेनेचे महेश शिंदे यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची लाजीरवाणी कती घडणं राज्याची मान शरमेने खाली घालणारी आहे.

असे असताना आता धक्काबुक्की सुरु होताच एक आमदार तिथून निघून जाताना दिसत आहे. हे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आहेत असं म्हटलं जातेय. ते गपचूप या गर्दीतून दूर झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्यावर गंमतीशीर मीम्स देखील व्हायरल होत आहेत. यामुळे शिवसैनिक सध्या त्यांच्यावर टिप्पणी करत आहेत.

शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी राजू शेट्टी आग्रही, मोदी सरकारकडे केली मोठी मागणी

दरम्यान, या गोधळामुळे आता आमदारांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचा एक आमदार या सगळ्यांना आवरताना दिसला. ते आमदार म्हणजे रोहित पवार. रोहित पवार यांनी आक्रमक झालेल्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधकदेखील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन करत होते.

यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात शाब्दीक वाद झाला. यानंतर प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले. असे असताना अजित पवार यांनी मार्ग काढत वाद थांबवला. या वादात अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. यामुळे मोठा राडा झाल्याचे दिसून आले. यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी राजू शेट्टी आग्रही, मोदी सरकारकडे केली मोठी मागणी

याबाबत अमोल मिटकरी म्हणाले की, शिंदे गटातील नेत्यांनी सर्वात प्रथम शिवीगाळ केली. आई-बहिणींनीवरुन शिवीगाळ केल्याचे मिटकरी यांनी सांगितले. यामुळे प्रकरण खूपच तापले असल्याचे दिसून आले. यामुळे आज सत्ताधारी देखील घोषणा देताना दिसून आले.

महत्वाच्या बातम्या;
ठाकरेंनी डावलले आता शिंदे देणार बळ! सेनेच्या वाघाची होणार सभागृहात एन्ट्री
मंत्रालयावर दोन तरुण आत्महत्या करण्यासाठी गेले, राष्ट्रवादीच्या आमदाराने धावत जाऊन वाचवला जीव...
इतर आमदार एकमेकांवर तुटून पडले, पण 'या' आमदाराचे होतेय कौतुक, धक्काबुक्की होताच पळत आले आणि..

English Summary: Nitesh Rane run away MLAs started fighting? Video viral..
Published on: 25 August 2022, 12:41 IST