एप्रिलच्या शेवटीही पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी पाऊस आणि गारपीट होत असली तरी उन्हाचा चटका कायम असल्याने राज्यात उन्हाच्या झळा बसत आहेत.
मागच्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे राज्याचील हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज (दि. 26) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे पुन्हा एकदा संकट आले आहे.
कपिल जाचक यांना केळीरत्न पुरस्कार, अधिक उत्पादन घेतल्याने परिषदेकडून सन्मान..
वादळी पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज (दि. 26) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आता कृषी अधिकाऱ्यांनी गरज नाही, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ड्रोनमधून होणार ई- पंचनामे...
ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आता उपचारासाठी मोदी सरकार देणार 5 लाख रुपये, असा घ्या लाभ..
उन्हाळ्यात काकडीच्या शेतीतून चांगले पैसे कमवा, काकडी शेतीची योग्य पद्धत जाणून घ्या
शेतकऱ्यांनो खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना
Published on: 26 April 2023, 10:33 IST