News

मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) ही मोदी सरकारने (Modi Government) सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmer Scheme) आहे. केंद्र सरकारची (Central Government) ही एक अशी योजना आहे, ज्याद्वारे दरवर्षी करोडो शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 10 May, 2022 7:41 PM IST

मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) ही मोदी सरकारने (Modi Government) सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmer Scheme) आहे. केंद्र सरकारची (Central Government) ही एक अशी योजना आहे, ज्याद्वारे दरवर्षी करोडो शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार दर चार महिन्यांनी 2 हजाराचा हफ्ता याप्रमाणे एकूण तीन हफ्त्यात दिले जातात.

महत्वाची बातमी:Farmers Income : भारतीय शेतकरी शेतीतुन किती कमवतो? नाही माहिती; मग वाचा याविषयी सविस्तर

मित्रांनो मोदी सरकारने ही योजना सुरू केल्यापासून यामध्ये अनेक बदल केले असून आता अनेक नवीन नियम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे आता अनिवार्य आहे. कोणत्याही शेतकऱ्याने या नियमांचे पालन केले नाही, तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकते तसेच त्यांना या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते.

आत्तापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण दहा हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजे एका शेतकऱ्याला आतापर्यंत सुमारे वीस हजार रुपये मदत केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. आता शेतकरी बांधव पुढील हप्त्याच्या अर्थात 11व्या हफ्त्याच्या पैशाची आतुरतेने वाट बघत आहेत.

महत्वाची बातमी:खांदेशात अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमला जातो नवीन सालगडी; मात्र कठीण परीक्षा करावी लागते पास; वाचा याविषयी

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शेवटच्या हप्त्याचे म्हणजे 10व्या हफ्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारकडून या योजनेच्या पात्र शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत. आता 11 वा हप्ता 15 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो, असा अंदाज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

महत्वाची बातमी:आनंदाची बातमी! 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; वाचा संपूर्ण जाहिरात

एका कुटुंबातून किती लोक पीएम किसान योजनेचा पैसे मिळवू शकतात?

मित्रांनो मोदी सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेबाबत जे नियम बनवण्यात आले आहेत ते अतिशय कडक स्वरूपाचे असून याचे उल्लंघन झाल्यास संबंधित शेतकऱ्याला योजनेपासून वंचित देखील ठेवले जाऊ शकते.

आता लोकांच्या मनात प्रश्न येतो की, एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळू शकतात का? तर मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसान योजनेचे पैसे कुटुंबातील फक्त एकाचं सदस्याला मिळू शकतात. दुसऱ्या सदस्याने आर्थिक फायदा घेतल्यास त्याच्यावर कारवाई होऊन पैसे परत घेतले जातात.

महत्वाची बातमी:महत्वाची बातमी! मोदी सरकार शेतकऱ्यांना म्हातारपणात देणार पेन्शन; वाचा या योजनेविषयी

English Summary: News work! Will more than one family member benefit from Modi government's 'Ya' scheme; Read on
Published on: 10 May 2022, 07:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)