महावितरण आणि शेतकरी यांच्यात सध्या मोठा वाद सुरू आहे. असे असताना आता वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून अनेक युक्त्या लढवल्या जात आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
सध्या महावितरणच्या दक्षता पथकांनी विदर्भात गेल्या नऊ महिन्यात तब्बल ११ कोटींची वीजचोरी उघडकीस आणली आहे. हा आकडा खूपच मोठा आहे. वीजचोरी सामाजिक अपराध आहे. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी उघडपणे वीज चोरली जाते.
या चोरीबाबत महावितरणच्या स्थानिक भरारी पथके, सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये किंवा जवळच्या महावितरणच्या कार्यालयास माहिती देणाऱ्यांना महावितरणकडून बक्षीस दिले जाईल. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिली. यामुळे आता वीजचोरी करणारांना आळा बसणार आहे.
घरात फक्त दोनच बल्प आणि बिल आलंय 34 हजार, महावितरणचा अजब कारभार
दरम्यान, सध्या राज्यभरात वीज वितरण हानी व वीजचोरीमुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. अनेक ठिकाणी उघडपणे विजचोरी केली जाते. यामुळे अनेक अडचणी येतात.
ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर खुनाचा आरोप, कोर्टाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा..
दरम्यान, नागपूर विभाग अंतर्गत मंडळ स्तरावर १२ तर विभागीय स्तरावर ३ भरारी पथके आहेत. नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण ९,९२४ ग्राहकांच्या वीज यंत्रणेची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,९६८ ग्राहकांकडे वीजचोरी आढळली. ही वीजचोरी ११.०२ कोटी रुपयांची होती.
महत्वाच्या बातम्या;
'साखर कारखान्यांचे गेल्या गळीत हंगामातील लेखापरिक्षण तातडीने पुर्ण करून अहवाल सादर करा'
काय सांगता! दिवसाला 33.8 लीटर दूध देणारी म्हैस; देशात ठरली नंबर १, अनेक पुरस्कारही नावावर...
कृषी जागरणतर्फे 12 जानेवारी IYOM 2023 साजरे करण्यासाठी मेगा इव्हेंट आयोजित, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला राहणार उपस्थित..
Published on: 12 January 2023, 12:57 IST