मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील एक राजधानी व दुसरी उपराजधानी असणाऱ्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे.
समृद्धी महामार्ग मुळे दळणवळणाची गती वाढणार असून अनेक प्रकारचे फायदे या मार्गामुळे होणार आहेत. समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना या महामार्गाच्या जवळून सीएनजी पाइप लाइन टाकण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असून 60 टक्के काम अद्याप पर्यंत पूर्ण झाले आहे. या गॅस पाईपलाईन मुळे अमरावती सह समृद्धी महामार्ग ज्या जिल्ह्यातूनकिंवा एखाद्या जिल्ह्याच्या आजूबाजूने गेला आहे, अशा जिल्ह्यांना येणाऱ्या काळामध्ये सीएनजी उपलब्ध होणार आहे. सीएनजीचा विचार केला तर काही जिल्हे सोडले तर अजूनही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सीएनजी पोहोचला नाही.
मात्र आता समृद्धी महामार्गाच्या कडेला असलेल्या पाईपलाईन द्वारे सीएनजी उपलब्ध होणार असून पेट्रोल आणि डिझेल ला चांगला भक्कम पर्याय उपलब्ध होणार आहे.समृद्धी महामार्गाला लागूनचसीएनजी गॅसची पाईपलाईन टाकण्याचे कामगॅस अथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल कडून सुरू झालेले आहे. या महामार्गाची रुंदी 120 मीटर असून त्यापैकी 30 मीटर ची एक बाजू याप्रमाणे दोन्ही बाजूने 60 मीटर चा मार्ग वाहनांच्या दळण्यासाठी तयार करण्यात आलाआहे.या मार्गाच्या शेवटच्या चार मीटर भागातून गॅस वाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असूनहा महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहेत त्या सर्व जिल्ह्यांना याचा फायदा होणार असूनयामध्ये अमरावती जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे.
समृद्धी महामार्गाचे फायदे
1- या मार्गामुळे नवीन शहरे विकसित केले जातील तसेच कृषी समृद्धीनगर ही एक नवीन शहर विकास प्राधिकरण आहे. जे द्रुतगती मार्गावर नवीन शहरे विकसित करेल. अशा शहरांचा विकास करण्याचा उद्देश तेथे राहणाऱ्या शेतकर्यांचे जीवन समृद्ध करणे हा असेल. तसेच या शहरांमध्ये औद्योगिक उत्पादन, व्यावसायिक सुविधा आणि व्यापाराला चालना मिळेल.
2- मुंबई आणि नागपूर प्रवासाचा वेळ होईल कमी-या मार्गामुळे मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या प्रवास हा आठ तासांपर्यंत कमी होईल. सध्या या प्रवासाला 16 तास लागतात.
3- व्यवसायांना चालना मिळेल- विविध कृषी आणि औद्योगिक नोड्स एक्सप्रेस वेशी जोडले जातील व त्यामुळे नागपूर आणि मुंबई ही प्रमुख ग्राहक बाजारपेठ आहेत. तसेच कृषी समृद्धी नगर गुंतवणूकदारांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, उत्तम वाहतूक आणि उच्च दर्जाचे निवासस्थान देखील प्रदान करेल.
महत्वाच्या बातम्या
Published on: 16 May 2022, 11:09 IST