राज्यात मोठ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लगली, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. अचानक हे सर्व घडल्याने अनेकांना धक्काच बसला. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करत फडणवीसांनी एक (Devendra Fadnavis) मास्टरस्ट्रोक मारला. यामुळे फडणवीस नेमकी काय भूमिका बजावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, अगोदर त्यांनी ते मंत्रीमंडळाच्या बाहेर असतील असे म्हटले गेले, मात्र पुन्हा सगळी सूत्र हलली.
असे असताना राष्ट्रवादीकडून कोणी जास्त प्रतिक्रिया दिल्या नाहीत, मात्र रात्री मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे बडे नेते धनंजय मुंडे याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे. धनंजय मुंडे यांनी सागर बंगल्यावर जात फडणवीस यांची भेट घेतली. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. २०१९ मध्ये जेव्हा अजित पवार यांनी भल्या पहाटे फडणवीसांसोबत शपथविधी सोहळा पार पडला. तेव्हा मुंडे हे नॉट रिचेबल होते.
यामुळे आता राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने आता अजून काय घडामोडी घडणार की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे. मात्र शुभेच्छा देण्यासाठी मुंडे गेले असतील असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास भेट झाली. या भेटीत काय चर्चा झाली हे अद्याप समोर आली नाही. मात्र काहीतरी नक्की नक्की होतंय अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी
रात्री साडेबारा वाजता धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली. अजित पवार यांनी याकाळात भाजपचा हात यामागे असेल असे वाटत नसल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे चर्चा सुरु झाली होती. यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात काय चमत्कार घडणार कस याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात, यामुळे या चर्चा जोर धरत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
मगरीने मित्रासमोर तरुणाला गिळले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पहा फोटो
डेअरीला दुध घालताना ही काळजी घेत का? होईल फायदा..
ईडीची कारवाई मात्र जरंडेश्वर कारखान्याचे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी गाळप
Published on: 01 July 2022, 03:09 IST