News

नागपुरी संत्रा (Nagpur Orange Orchard) विशेषता त्याच्या अप्रतिम चवीसाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. नागपूरची संत्री त्याच्या विशिष्ट चवीमुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. याची मागणी खुप अधिक असते, नागपूरची संत्री (Nagpur News) परदेशात देखील निर्यात केली जाते. नागपूरच्या बहुतांशी शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) हे संत्रा पिकावर अवलंबून आहे.

Updated on 07 May, 2022 5:03 PM IST

नागपुरी संत्रा (Nagpur Orange Orchard) विशेषता त्याच्या अप्रतिम चवीसाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. नागपूरची संत्री त्याच्या विशिष्ट चवीमुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. याची मागणी खुप अधिक असते, नागपूरची संत्री (Nagpur News) परदेशात देखील निर्यात केली जाते. नागपूरच्या बहुतांशी शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) हे संत्रा पिकावर अवलंबून आहे.

दर वर्षी त्यांना संत्रा बागेतून चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. मात्र यावेळी नागपूरचे संत्रा बागायतदार नाराज झाले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीचे कारण म्हणजे यावेळी संत्रा आणि मोसंबीची ही फळे वातावरणातील बदलामुळे गळू लागले आहेत.

खरं पाहता, संत्रा पीक हे दोन वेळा येते यात आंबिया आणि रब्बी बहार पकडला जातो. या दोन्ही बहारात उत्पादित होणारे पीक हे शेतकऱ्यांसाठी वर्षभर कमाईचे साधन असते. यंदा डिसेंबर ते जानेवारीदरम्यान आलेल्या आंबिया बहाराचे पीक नेहमीपेक्षा जास्त आले आहे. मात्र संत्रा आणि मोसंबीची ही फळे वेळेपूर्वीच गळून पडू लागली आहेत.

महत्वाच्या बातम्या:

असा कसा हा आडमुठेपणा! लिलाव झाला तरी कांदा घेण्यास व्यापाऱ्याची टंगळमंगळ; अखेर शेतकऱ्याने केली कंप्लेंट अन…..

…अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला! 510 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा; साडेतीन लाख शेतकऱ्यांचा फायदा

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, वाढत्या उन्हामुळे संत्रा फळांची गळ सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड आणि काटोलमध्ये सर्वाधिक संत्रा आणि मोसंबीचे उत्पादन होते. अतिवृष्टीमुळे रब्बीची बहार उद्ध्वस्त झाली, तर डिसेंबर, जानेवारी महिन्यात आलेली आंबिया बहारही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. नागपुरात तापमान 45 अंशांवर गेल्याने वातावरणातील ओलावा पूर्णपणे नष्ट झाला असून त्यामुळेच अनेक वर्षांपासून जोपासलेल्या संत्र्याच्या झाडांवरून संत्री अकाली अर्थात वेळेपूर्वी पडू लागली आहेत.

काळ्या बुरशीमुळे पिकांचे नुकसान

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात 10 हजार 712 हेक्टरमध्ये संत्रा, तर 6 हजार हेक्टरमध्ये मोसंबी पिकाची लागवड करण्यात आली असून यावेळी नागपूर विभागात हे फळ सूर्यप्रकाशामुळे सुकले आणि फळे वेळेपूर्वीच जमिनीवर पडत आहेत. अनेक झाडांना विविध रोगांनी घेरले आहे. शेतकरी बांधवांनी त्यावर औषधोपचारही केले. पण मात्र ही फळांची गळ थांबू शकली नाही. शेतकर्‍यांच्या बोलक्या भाषेत याला काळ्या बुरशीचा रोग म्हणतात, ज्यामध्ये फळे लिंबाच्या आकाराची झाल्याबरोबर गळून पडतात आणि पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होते.

शेतकऱ्यांची सरकारला विनंती काय?

आता काटोल नरखेड व नजीकच्या शेतकऱ्यांनी दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत शासनाकडे मदतीची विनंती केली आहे. हे पीक वाचवण्यासाठी त्यांनी जमा केलेले भांडवल देखील आता खर्चून टाकले आहे, तरीही पीक तग धरू शकले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र सरकार ज्या प्रकारे इतर भागातील पिकांच्या नुकसानीची भरपाई देते, त्याच पद्धतीने नागपुरात संत्रा, मोसंबी या पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढावेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

English Summary: Nagpur Orange: Nagpur Orange will not be available this year; Orchards damaged by rising black fungus
Published on: 07 May 2022, 05:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)