News

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याला सध्या चांगला दर नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे असताना आता नाफेड कांदा बाजारपेठेत आणणार आहे. अशा आशयाच्या चर्चेने कांदा उत्पादक चिंतेत आहेत. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated on 19 September, 2022 4:22 PM IST

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याला सध्या चांगला दर नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे असताना आता नाफेड कांदा बाजारपेठेत आणणार आहे. अशा आशयाच्या चर्चेने कांदा उत्पादक चिंतेत आहेत. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या कांद्याला भाव नाही, त्यात नाफेडचा कांदा बाजारात आल्यास कांद्याचा वांदा होईल या भीतीने शेतकरी चिंतेत सापडला आहे. कांदा परिषद घेऊन कांदा उत्पादकांचे कैवारी आहोत असे टाहो फोडणारे सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, गोपीनाथ पडळकर आणि किरीट सोमय्या हे मात्र आता मुके झाले आहेत की काय असा प्रश्न कांदा उत्पादक विचारत आहेत.

यामुळे शेतकरी कांद्याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी करत आहेत. सध्या चाळीत साठवलेला कांदा पावसामुळे निकृष्ट होत असताना आता नाफेड आपला कांदा बाजारात आणत असल्याने आणखी दर घसरणीची भीती उत्पादकांमध्ये आहे. शेतकर्‍यांचा चाळीत कांदा पडून असताना नाफेडचा अडीच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आल्यास काय होईल, या विचाराने ते धास्तावले आहेत.

भीमाशंकर साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

तसेच त्यातून स्थानिक बाजारात नाफेडच्या विक्रीला विरोध होत आहे. कांदा दर स्थिरीकरण योजनेंतर्गत केंद्र सरकारने नाफेडमार्फत अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करूनही त्याचा फारसा लाभ झालेला नाही. यामुळे सरकारच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे भाजपच्या सहकार्याने रयत क्रांती संघटनेने कांदा परिषदेचे आयोजन केले होते. त्यातून नाफेड, पर्यायाने केंद्र सरकारच्या विरोधात उत्पादकांनी चालविलेल्या आंदोलनाची दिशा तत्कालीन महाविकास आघाडीकडे वळविण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. सरकारवर जोरदार टीका देखील झाली.

गुजरातसह उत्तरेकडून येणाऱ्या राज्यांतील जनावरांना महाराष्ट्रात येण्यास मनाई, लम्पीरोग रोखण्यासाठी निर्णय..

यामुळे आता सरकार मर्जीतले आहे, यावर आता निर्णय घ्या असा प्रश्न शेतकरी करत आहेत. दरम्यान, नवीन लाल कांदा बाजारात येईपर्यंत चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्यावर सर्वांची भिस्त असते. या काळात अनेकदा टंचाई निर्माण होऊन दर गगनाला भिडतात. आता शेतकऱ्यांच्या जुना कांदा खराब होत चालला आहे.

महत्वाच्या बातम्या;
Solar Pump Yojana: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, सौरपंपावर 60 टक्क्यांची सूट, असा करा अर्ज
शेतकऱ्यांपुढे नवे संकट, घाेणस अळीचा प्रभाव वाढला, चावा घेतल्याने अनेक शेतकरी रुग्णालयात
भारतीय डेअरी उद्योग आज जागतिक झाला आहे, सेबॅस्टियन बिमिता यांनी केले देशाचे कौतुक

English Summary: Nafed's onion market? concern farmers increased
Published on: 19 September 2022, 04:22 IST