News

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकार विविध योजना आखत असते.

Updated on 03 February, 2021 6:25 PM IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे,  यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे  यासाठी सरकार विविध योजना आखत असते.  पण  बरेच  शेतकरी या योजनांपासून वंचित असतात कारण त्यांना योजनांची माहिती मिळत नसते. आत्ता  केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक पशूपालनासंबंधी योजना आणली आहे.  सरकार आता पशुपालनाच्या कर्जावर शेतकऱ्यांना आणि पशुपालनाच्या व्यवसाय करणाऱ्यांना अनुदान देणार आहे. हे अनुदान नाबार्ड (नॅशनल बँक अॅग्रीकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट 

मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला सहिवाल, लाल सिंधी, गीर, राठी आणि म्हैशींची डेअरी सुरू करायची आहे.  जर  तुमच्याकडे दहा जनावरे आहेत तर तुम्हाला ७ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. डीईडीएसच्या माध्यमातून पशूसंवर्धन विभाग आपल्याला हे कर्ज उपलब्ध करू देणार आहे.दुग्ध व्यवसाय विकास योजना (Dairy Entrepreneurship Development Scheme ) च्या अंतर्गत डेअरीसाठी तुम्ही केलेल्या खर्चाच्या रक्कमेवर तुम्हाला २५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.  जर तुम्ही एससी आणि एसटी प्रर्वगातील असाल तर तुम्हाला हे अनुदान ३३ टक्के मिळणार आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे ज्यांच्याकडे १० जनावरे  असतील त्यांनाच हे अनुदान मिळणार असून तेच या अनुदानासाठी पात्र असतील.  नाबार्डमार्फत हे अनुदान बँकेमध्ये जमा होईल. ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेणार त्याच बँकेत अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.   बँक कर्ज घेणाऱ्याच्या नावावर ते अनुदान आपल्याकडे ठेवणार आणि नंतर पशुसंवर्धन विभाग कर्ज देईल.

हेही वाचा:नाबार्डच्या मदतीने सुरू करा दूध डेअरी; अन् कर्जावर मिळवा ३३ टक्क्यांची सब्सिडी

कोणत्या बँकांमध्ये मिळणार कर्ज

कमर्शियल बँक, प्रादेशिक बँक, राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्डकडून पुनर्वित्त करण्यास पात्र आहेत.  स्टेट बँक, ग्रामीण बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यासह राष्ट्रीयकृत बँकादेखील या योजनेंतर्गत पात्र आहेत.

हेही वाचा:कोरोना : शेत मजुरांना नाबार्ड पुरवणार मोफत मास्क

पशुपालनासाठी कसे मिळवाल कर्ज

राष्ट्रीयकृत बँकेला भेट द्यावी लागेल किंवा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात आपल्याला नाबार्डच्या अनुदानाचा अर्ज मिळेल. अर्ज भरल्यानंतर पशुवैद्याला आवश्यक कागदपत्रासह बँकेत जावे लागेल.   मग पशुपालन करणाऱ्यांचा अर्ज मंजूर करू घेतला जाईल आणि तो अर्ज नाबार्डकडे पाठवला जाईल. त्यानंतर नाबार्ड अनुदासाठी बँकेकडे कर्जाचे वर्ग करेल. पशुपालनासाठी कर्ज मागणाऱ्यांकडे कुठल्याच बँकेचा कर्जदार नसावा. जर तुमच्यावर कोणत्या बँकेचे कर्ज असेल तर तुम्ही पशुपालनाचे कर्ज घेण्यास अपात्र ठराल.

English Summary: NABARD is Offering Loan up to 7 lakh and 25% subsidy to Livestock Farmers
Published on: 24 March 2020, 06:30 IST