News

हरभरा पिक रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात रब्बी हंगामात हरभरा लागवड करण्यात येते.

Updated on 28 May, 2022 9:27 AM IST

हरभरा पिक रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात रब्बी हंगामात हरभरा लागवड करण्यात येते.

राज्यांमध्ये सन 2021-22 रब्बी हंगामात हरभरा चे तब्बल 27 लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर  शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून हरभऱ्याची नाफेड कडून खरेदी सुरू होती. याठिकाणी हरभऱ्याला पाच हजार दोनशे तीस रुपये हमी भाव दिला जात होता.

परंतु नाफेडणे शासकीय योजनांसाठी लागणारा 6.80 लाख टन हरभरा खरेदी केला. परंतु अजून देखील शेतकऱ्यांकडे 20.76 लाख टन हरभरा पडून आहे. नाफेडने हरभरा खरेदी बंद करताच खुल्या बाजारात देखील हरभऱ्याचे भाव गडगडले. सध्या खुल्या बाजाराचा विचार केला तर  सरासरी साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल या दराने शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जात आहे

या दृष्टिकोनातून नाफेड चा भाव आणि खुल्या बाजारातील भाव यांची तुलना केली तर तब्बल सातशे रुपये एका क्विंटल मागे तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हरभरा खरेदी चे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे ही खरेदी  थांबवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर चार हजार दोनशे ते चार हजार आठशे आणि सरासरी 4500 या दराने हरभरा खरेदी होत आहे. नाफेड आणि खरेदी केंद्रे बंद केली परंतु शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 700 रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना उगीचच मनस्ताप होत आहे.

एक निर्णय घेते परंतुशेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान एका निर्णयामुळे होते. नाफेडने एकूण  हरभरा उत्पादनापैकी अवघा पाचवा हिस्सा खरेदी करून खरेदी केंद्र बंद केले.अजून शेतकऱ्यांकडे वीस लाख टनांच्या पुढे हरभरा पडून असून शेतकऱ्यांना आता 700 रुपये प्रतिक्विंटल तोटा सहन करून हरभरा विकण्याशिवाय पर्याय नाही. नाफेड आणि दोनच दिवसापूर्वी 5230 रुपयांनी हरभरा खरेदी केली होती.

परंतु आता शेतकऱ्यांना खुल्या बाजारात साडेचार हजार रुपयांप्रमाणे हरभरा विकण्याची वेळ आली आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:गावो विश्वस्य मातर: घरगुती पद्धतीने कढवलेले आणि A2 प्रकारच्या दुधापासून तयार केलेल्या तुपाचे आरोग्यदायी फायदे

नक्की वाचा:चढ्या दराने बियाणे आणि खतांची विक्री केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार- कृषीमंत्री दादाजी भुसे

नक्की वाचा:Aadhar Card: तुमचे आधार कार्ड बनावट तर नाही ना? जाणुन घ्या बनावट आधार कार्ड ओळखण्याची प्रोसेस

English Summary: naafed stop purchasing of gram crop so farmer get 700 rupees loss per quintal
Published on: 28 May 2022, 09:27 IST