News

जर आपण भारताचा चालू हंगामाचा विचार केला तर भारतामध्ये हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. नाफेडने शेतकऱ्यांकडून 25 लाख 50 हजार टन हरभरा हमीभावाने खरेदी केला. जर आपण कडधान्यांच्या बाबतीत सरकारकडे असणाऱ्या बफर स्टॉकचा विचार केला तर तो 23 लाख टन असणे गरजेचे आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हा स्टॉक 36 लाख टन इतका आहे.

Updated on 31 August, 2022 12:27 PM IST

जर आपण भारताचा चालू हंगामाचा विचार केला तर भारतामध्ये हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. नाफेडने शेतकऱ्यांकडून 25 लाख 50 हजार टन हरभरा हमीभावाने खरेदी केला. जर आपण कडधान्यांच्या बाबतीत सरकारकडे असणाऱ्या बफर स्टॉकचा विचार केला तर तो 23 लाख टन असणे गरजेचे आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हा स्टॉक 36 लाख टन इतका आहे.

नक्की वाचा:देशात दुधाचे उत्पादन 11 टकक्यांपर्यंत घटले, दूध दर वाढीत तेजी कायम,आता एकाच पर्यायावर शेतकऱ्यांची भिस्त

 नाफेड कडे जो काही 30 लाख टन हरभरा आहे त्यापैकी पाच लाख टन हरभरा 2020-21 चा हंगामातील असून तो नाफेड आता विक्रीसाठी खुल्या बाजारात घेऊन येत आहे.

एवढेच नाही तर या प्रक्रियेसाठी ऑनलाइन निविदा देखील मागविल्या जाणार आहे. नाफेडचा हरभरा महाराष्ट्रातच नव्हे तर चालू दरानुसार मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात विकला जाणार आहे.

नक्की वाचा:कामाची बातमी! शेतकऱ्यांनोहीप्रक्रिया केली तरचं मिळणार 50 हजारांचे अनुदान; जाणून घ्या अंतिम मुदत

सध्या हरभऱ्याची बाजार स्थिती

 जरा पण सद्यस्थितीत हरभऱ्याचा भावाचा विचार केला तर तो हमीभावापेक्षा देखील कमी आहे. 5230 रुपये सरकारने हमीभाव जाहीर केला आहे मात्र सध्या दर 4200 ते 4 हजार 600 प्रति क्विंटलच्या दरम्यान घेतला जात आहे.  परंतु जर नाफेडने त्यांच्या बफर स्टॉक मधला हरभरा जर खुल्या बाजारात आणला तर त्याचा विपरीत परिणाम हरभरा दरावर होण्याची शक्यता आहे.

यासाठी शेती क्षेत्रातील काही जाणकारांचे मत आहे कि नाफेडने हा हरभरा खुल्या बाजारात न आणता रेशनवर द्यावा किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विकावा. परंतु काही जाणकारांच्या मते खुल्या बाजारात हरभऱ्याचा साठा जरी विकला तरी सध्याच्या बाजारभावानुसार त्याचा परिणाम होणार नाही.

नक्की वाचा:Agri News: 'या' तारखेपासून सुरू होईल या वर्षीच्या ऊस गळीत हंगाम,वाचा माहिती

English Summary: naafed can gram for selling in open market in buffer stock so effect on market rate
Published on: 31 August 2022, 12:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)