News

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या मोठा बंड केल्याने राज्यात सरकार अडचणीत आले आहे. अनेक आमदारांना घेऊन ते आसाममध्ये आहेत. त्यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीही सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Updated on 22 June, 2022 12:06 PM IST

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या मोठा बंड केल्याने राज्यात सरकार अडचणीत आले आहे. अनेक आमदारांना घेऊन ते आसाममध्ये आहेत.
त्यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीही सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

असे असताना यानंतर शिवसैनिकांमध्ये एकच रोष पाहिल्याचे मिळाले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. यातच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते नितिन नांदगावकर (Nitin Nangaonkar) यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. गद्दारांना सोडणार नाही. माझे काम ठोकायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच याआधी समाजकंटकांना ठोकून काढत होतो. मात्र, आता मला असे वाटतेय की गद्दारांना चोपायची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

कारल्यातून लाखोंची कमाई! उत्पादनाबरोबरच वाढीव दराने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस

शिवसैनिकांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांनी पाय ठेवून दाखवावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या एकेका आमदारांना संपर्क साधून वर्षा बंगल्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची मोठी बैठक पार पडली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शिवसेना भवनाकडे जमा होण्याचे आदेश दिले. यावेळी नितीन नांदगावकर हेदेखील सेना भवनावर दाखल झाले. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते.

महत्वाच्या बातम्या;
चिखलातून वाट, दुचाकी ट्रकमधून प्रवास, लंघुशंकेचं कारण देत शिवसेना आमदार आले पळून...
आता 'एक देश एक रेशन कार्ड', तुमच्या फायद्यासाठी देशभरात नवी योजना लागू
मुलींना सरकार देणार ५१ हजार रुपये, करा फक्त 'हे' काम

English Summary: 'My job is to hit, I won't let traitors go'
Published on: 22 June 2022, 12:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)