यावर्षी महाराष्ट्रात हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे उत्पादन झाले असून हरभऱ्याची चांगली आवक बाजारपेठेत होत आहे.
जर सद्यस्थितीत आपण हरभरा दराचा विचार केला तर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तो खाली आलाय. जर आपण हमीभावाचा विचार केला तर शासकीय हमीभावाच्या माध्यमातून 5230 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. परंतु हरभऱ्याच्या लोकप्रिय जातींमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले विक्रम ही जात चांगल्या उत्पादन मुळे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये पसंतीस उतरली आहे. विशेषता मराठवाड्यामध्ये या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परंतु या जातीचे उत्पादन हाती आल्यानंतर यामध्ये हरभऱ्याचे काही दाणे हिरव्या रंगाची दिसून येतात. याच कारणामुळे शासनाच्या हमीभाव केंद्रांवर या जातीच्या हरभरा खरेदीला टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या जातीचा हरभऱ्याचा रंग हिरवा असून तो अपरिपक्व आहे, हे कारण पुढे करीत भारतीय खाद्य महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीस टाळाटाळ केली जात आहे.
परंतु या बद्दलराहुरी कृषी विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की हिरवा रंग म्हणजे अपरिपक्वता नाही. मात्र या बाबतीत अनेक परस्परविरोधी दावे होत असल्याने उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हरभरा गोदामावरून परत पाठवला जात असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये भारतीय खाद्य महामंडळ हरभऱ्याचे खरेदी करत असून कर्मचाऱ्यांना पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे हरभरा खरेदी करत असताना हिरवा रंगाच्या कारण पुढे करून फुले विक्रम जातीच्या हरभरा खरेदी केला जात नाहीये. शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे कट्टे परत पाठवले जात असून शेतकरी यामुळे अडचणीत आले आहेत. या जातीमध्ये पाच ते दहा टक्के हरभरा हिरव्या रंगाचा राहतो. सर्वसामान्य आकार हा इतर हरभऱ्याच्या जाती सारखाच असतो. या हरभऱ्याचा उपयोग डाळ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. परंतु तरीदेखील भारतीय खाद्य महामंडळ या जातीच्या हरभऱ्याचा परिपक्व समजत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे बियाणे असून यावर देखील भारतीय खाद्य महामंडळ शंका घेत असल्याने कोणते बियाण्याची पेरणी येणाऱ्या काळात करावी असे देखील प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेतकरी संघटनेनी घेतली राजकीय भूमिका व उद्देश
नक्की वाचा:खरं काय! भाड्याची जमीन घेऊन तुम्हीही खोलू शकता पेट्रोलपंप; वाचा या भन्नाट बिजनेसविषयी
Published on: 04 May 2022, 08:43 IST