सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांनी सेनेत बंड केले आहे, ते सध्या गुवाहाटी येथे आहेत. यामुळे आता ते नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोठ्या हॉटेलमध्ये हे सगळे आमदार थांबले आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला फोन करुन आपली चैन वर्णन करुन सांगितली होती. काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल.. सर्व ओकेमध्ये आहे, असे म्हंटले होते. हा ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
रेडीसन ब्लू या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हे सर्व आमदार उतरले आहेत. सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्व आमदार झोपून उठतात, नंतर व्यायाम आणि हिरवळीवर मॉर्निंग वॉक, नंतर भरपेट नाश्ता, टिव्हीवर बातम्या पहाणे, वर्तमान पत्रे वाचणे, दुपारी जेवणाच्या अगोदर मिटींग, एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन मग वामकृक्षी. सायंकाळी पुन्हा चर्चा आणि बैठका रात्री गाण्यांच्या भेंड्या आणि झोप, असा सगळ्यांचा दिनक्रम आहे. सगळे आमदार अगदी मजेत आहेत.
तसेच आमदारांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील आहे. तसेच नेत्यांच्या आदेशाशिवाय हॉटेल बाहेर पडण्यास आमदारांना मज्जाव केलेला आहे. यामुळे आमदारांची सगळी सोय याठिकाणी करण्यात आली आहे. स्पा, मसाज, पोहणे आणि राजकारणाची गणिते यात सुखाचे दिवस आमदार भोगत आहेत तर इकडे महाराष्ट्रात एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहरीत फास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
'आता साखर कारखानदार, संचालक आणि उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील'
तसेच राज्यात अजून पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. यामुळे आमदारांना नेमकं कशासाठी निवडून दिल आहे, असा प्रश्न आता मतदार संघातील लोक विचारत आहेत. यामुळे आता हा घोळ कधी मिटणार आणि कधी आमदार कामे सुरु करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेकजण वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
दारू पिल्यावर तो व्यक्ती इंग्रजी संभाषण का करतो, जाणून घ्या खरे कारण..
मोठी बातमी! दुधाच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी, अमूल ग्रुपने घेतला मोठा निर्णय..
काय सांगता! स्वत:च्या लग्नाला आमदार गैरहजर, गुन्हा दाखल; म्हणाले, मला लग्नाबद्दल कुणी सांगितलंच नाही..
Published on: 28 June 2022, 03:22 IST