News

Monsoon Update: सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आजही मुसळधार पावसाचा (Monsoon) इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे (Monsoon News) महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Updated on 21 July, 2022 10:20 AM IST

Monsoon Update: सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आजही मुसळधार पावसाचा (Monsoon) इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे (Monsoon News) महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यासोबतच ओडिशा, आसाम, तेलंगणा या राज्यांमध्येही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. येथील संततधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये खडक घसरण्याच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळणावर परिणाम झाला.

दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत वायव्य भारतात मान्सूनच्या हालचाली वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  आज उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि आसाममध्ये नदीचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

खरं काय! फक्त 80 हजारात खरेदी करता येणार मारुती अल्टो सीएनजी, ऑफर समजून घ्या

हवामान खात्याने आज दिल्लीत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार आज ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. याआधी बुधवारीही दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार पाऊस झाला. एमआयडीने पुढील तीन दिवस दिल्लीत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

यासोबतच आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गोवा, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.  त्याचबरोबर पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यासोबतच पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, झारखंड, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्रमध्ये 24 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील 24 तासांत गुजरात प्रदेश, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश, किनारपट्टीवरील कर्नाटक, केरळ, उत्तराखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात पावसाची शक्यता आहे. यासोबतच उत्तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग आणि उत्तर मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

Business Idea 2022: एका वर्षातचं लखपती बनायचे असेल तर सुरु करा हा बिजनेस, वाचा सविस्तर

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हवामान विभाग (IMD) हवामानाच्या इशाऱ्यांसाठी चार वेगवेगळ्या रंगीत अलर्ट जारी करतो. ज्यामध्ये 'ग्रीन अलर्ट' (कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही), 'यलो अलर्ट' (परिस्थितीवर लक्ष ठेवा), 'ऑरेंज अलर्ट' (परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार रहा) आणि 'रेड अलर्ट' (त्याला सामोरे जाण्यासाठी पावले उचला) यांचा समावेश आहे.

English Summary: monsoon update imd alert to these state
Published on: 21 July 2022, 10:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)