News

Monsoon Update: राज्यातील बहुतांशी जनता तसेच शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असला तरीदेखील जूनच्या या पहिल्या पंधरवाड्यात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस बघायला मिळाला नाही. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यात जवळपास पन्नास ते साठ टक्के पाऊस कमी पडला आहे.

Updated on 16 June, 2022 10:42 PM IST

Monsoon Update: राज्यातील बहुतांशी जनता तसेच शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असला तरीदेखील जूनच्या या पहिल्या पंधरवाड्यात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस बघायला मिळाला नाही. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यात जवळपास पन्नास ते साठ टक्के पाऊस कमी पडला आहे.

यामुळे शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली असून पेरणीसाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजून काही काळ मान्सूनच्या पावसाची वाट पहावी लागणार आहे. हवामान तज्ञांच्या मते, पाकिस्तान मधून येत असणाऱ्या सततच्या वाऱ्यामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे येत असून सध्या मान्सून हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती भागात रेंगाळत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये मान्सूनचा प्रवास हा योग्य गतीने सुरू आहे. मात्र पाकिस्तान मधून येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेश मधून मान्सूनच्या प्रवासाला अडथळे येत आहेत. आता मान्सून हा मध्यप्रदेश मध्ये खोळंबला असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार मध्यप्रदेशच्या बडवानी मध्ये सध्या मान्सून हा रेंगाळत आहे.

शिवाय आता मान्सूनचा प्रवास योग्य गतीने झाल्यास बडवानी मधून मान्सून इंदूर ऐवजी जबलपूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होणार आहे. दरम्यान जबलपुर मध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे निश्चितच तेथील जनतेला दिलासा मिळाला असून महाराष्ट्रातील जनता देखील सुखावणार आहे. दरम्यान हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली तीव्र झाल्यामुळे मध्य प्रदेश मध्ये हा पाऊस होत आहे.

शिवाय या भागात आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ आणि शास्त्रज्ञ वेदप्रकाश सिंह यांच्या मते, अरबी समुद्रात मान्सून सक्रिय झाला असून मान्सून आता हळूहळू पुढे सरकत आहे. मात्र असे असले तरी पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सून अडकला आहे.

बुधवारपासून पाकिस्तानकडून वाऱ्याची दुसरी फेरी मध्य प्रदेशात येणार आहे. आता एक प्रणाली आधीच सक्रिय आहे. अशा स्थितीत अरबी समुद्रातून येणारा मान्सून आणखी पुढे जाण्यास अडथळे होणार आहेत. यामुळे मान्सूनचा प्रवास पुढे सुरू राहण्यासाठी पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्याच्या थांबण्याची वाट पाहावी लागणार आहे. निश्चितच पाकिस्तानातून येणारे वारे महाराष्ट्रातील जनतेसाठी त्रासदायक सिद्ध होत आहेत. पेरणीसाठी आतूरतेने मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजाची देखील या पाकिस्तानच्या वाऱ्यांमुळे डोकेदुखी वाढली आहे.

English Summary: Monsoon Update: Because of Pakistan is delaying monsoon in Maharashtra
Published on: 16 June 2022, 10:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)