News

Monsoon News: आज 26 जूनपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय इत्यादी राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची (Monsoon) शक्यता आहे. याशिवाय, केरळ, कर्नाटक सारख्या दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.

Updated on 26 June, 2022 10:44 PM IST

Monsoon News: आज 26 जूनपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय इत्यादी राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची (Monsoon) शक्यता आहे. याशिवाय, केरळ, कर्नाटक सारख्या दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.

दुसरीकडे, दिल्ली आणि यूपीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या राज्यात लवकरच मान्सून दाखल होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी मान्सून राजधानीत दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने (Indian Meteorological Department) व्यक्त केला आहे.

राजधानीत मान्सून दाखल झाल्यानंतर म्हणजे 27 जूनपासूनच दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी IMD ने अनेक राज्यांमध्ये पुढचे 5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, सिक्कीम, केरळ आणि गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 29 जूनपर्यंत ओडिशा, बिहार, झारखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय उत्तराखंडमध्ये 27-29 जूनपर्यंत आणि उत्तर प्रदेशमध्ये 28-29 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

खरं पाहता, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी सांगितले की खरीप पिकासाठी महत्त्वपूर्ण नैऋत्य मान्सून 6 जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितले आहे, तसेच सामान्य तारीख 8 जुलै आहे. भारतीय हवामान विभागाने पुढे असेही म्हटले आहे की, मान्सून लवकर सुरू झाल्यानंतर, दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि नंतर मध्य भारतावर अनुकूल प्रणाली नसल्यामुळे नैऋत्य मान्सून उशिराने पुढे सरकत आहे.

IMD ने सांगितले की, आजपर्यंत मान्सूनची उत्तर सीमा (NLM) पोरबंदर, वडोदरा (दोन्ही गुजरात), शिवपुरी, रीवा (दोन्ही मध्य प्रदेश) आणि चुर्क (यूपी) मधून जात आहे. तसेच IMD म्हणते की नैऋत्य मान्सून साधारणपणे 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. तथापि, गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या विस्तारित श्रेणी अंदाज (ERF) ने म्हटले: 'दक्षिण-पश्चिम मान्सून 30 जून ते 6 जुलै या कालावधीत संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता आहे.'

English Summary: monsoon news imd monsoon forecast release
Published on: 26 June 2022, 10:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)