शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहे. यामुळे त्याला मदतीची गरज आहे. असे असताना सरकारकडून अनेक योजनांची घोषणा केली जाते. यामुळे आता याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. केंद्र सरकारने किसान (Credit Card) क्रेडिट कार्ड ची योजना शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेचे महत्व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगितले जात आहे. अनेकांनी याचा फायदा देखील घेतला आहे.
शेतकऱ्यांची भांडवल ही नेमकी अडचण ओळखून ही योजना सुरु करण्यात आली आहे. अनेकांना याबाबत अजूनही माहिती नाही. ग्रामीण भागात आजही अनेक शेतकऱ्यांना हे कार्ड मिळवायचे कसे याचीच माहिती नाही. यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आगोदर याची प्रक्रिया माहिती होणे गरजेचे आहे.
याबाबत माहिती अशी की, किसान क्रेडिट कार्ड बनवल्यानंतर शेतकरी बांधव 9 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. त्याचबरोबर सरकारने व्याजावर सवलत देत 2 टक्के सबसिडी दिली आहे. यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्याने वेळेपूर्वी व्याज भरले तर त्याला सरकार 3 टक्के सबसिडी देते. यामुळे शेतकऱ्यास फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.
यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, प्रतिज्ञापत्र, ज्यामध्ये आपण इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही असे नमूद केले आहे. किसान कार्ड मिळवायचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम शेतकऱ्यांना किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. मग येथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड कारावा लागणार आहे. शेतकऱ्यांना तो फॉर्म कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्या मदतीने तो भरुन जवळच्या बँकेत सबमिट करावा लागणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी लागणार आहे.
तुम्हाला बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाते. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेला भेट देऊन देखील फॉर्म मिळवू शकता. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी याचा फायदा देखील घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भांडवल उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठी मोठा निर्णय, आता फायदाच फायदा..
SBI बँकेकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, ट्रॅक्टर खरेदीसाठी देणार कर्ज, असा घ्या लाभ...
तोडायला १० हजार, गाडीमागे पाचशे, जेवायला मटण, ऊस उत्पादक म्हणतोय आता ऊस लावायचा नाही..
Published on: 03 April 2022, 11:24 IST