News

सध्या सरकारी चार कंपन्या सामान्य विमा क्षेत्रात आहेत.

Updated on 17 October, 2022 10:48 AM IST

सध्या सरकारी चार कंपन्या सामान्य विमा क्षेत्रात आहेत. त्यात न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.

सरकारी विमा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.There is good news for the employees of government insurance companies. मोदी सरकारने या कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठे गिफ्ट दिले आहे.

शेतकऱ्यांना खुशखबर उद्या मिळणार 12 वा हप्ता, सोबत मिळणार 'हे' खास गिफ्ट

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चार सरकारी विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 12 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत 14 ऑक्टोबर 2022 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ऑगस्ट 2017 पासून पगार वाढवरील सरकारी विमा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारातील ही वाढ ऑगस्ट 2017 पासून लागू होणार आहे, तसेच त्यावेळी या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पगारवाढीचे लाभ दिले जातील. अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाच वर्षांची थकबाकी दिली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

विमा कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या पगारवाढीला ‘सामान्य विमा (अधिकारी आणि इतर सेवा शर्तींसह) सुधारणा योजना 2022’ म्हटलं जाऊ शकते. कंपनी व कर्मचार्‍यांच्या कामगिरीनुसार ऑगस्ट 2022 च्या देय वेतनात सुधारणा केली जाणार असल्याचे अधिसूचनेत म्हटलं आहे.खरं तर सरकारी बँका व विमा कंपन्यांच्या

कर्मचाऱ्यांच्या वेतनात दर पाच वर्षांनी सुधारणा केली जाते. 2017 मध्येच सामान्य विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल करणं अपेक्षित होतं. मात्र, त्याला 5 वर्षे उशीर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पुढील वेतन सुधारणादेखील ऑगस्ट-2022 मध्ये होणार होती. मात्र, आता त्यालाही उशीर होण्याची शक्यता आहे.

English Summary: Modi government is giving a big Diwali gift to these government employees
Published on: 17 October 2022, 08:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)