सध्या फुल उत्पादक शेतकरी दर घसरल्यामुळं रस्त्यावर फुले फेकताना दिसत आहेत. याबाबत व्हिडीओ जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर येथील आहे. फुलांना भाव मिळत नसल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकून आपला संताप व्यक्त केला. गुलाब, मोगरा, गलांडा यासह इतर फुलांना बाजारात किलोला 5 रुपयांचा दर मिळत आहे.
त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे शेतकरी नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी एक पोस्ट करून म्हटले आहे, की केंद्र सरकारने चीनी कृत्रिम फुलावर बंदी घालावी अशी गेल्या सहा महिन्यापासून मी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव यांचेकडे मागणी करत आहे. पण केंद्र सरकार याबाबत उदासिनता दाखवित आहे.
लॅाकडाऊन व चीनी कृत्रिम फुलांच्या शिरकावामुळे फुल उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. मेक इन इंडियाच्या जयघोषात चीनी फुलांनी केलेल्या शिरकावामुळे फूल उत्पादक शेतक-यावरही आता आत्महत्या करण्याची वेळ येऊ लागली आहे.
इथेनॉल निर्मितीतून इंधन निर्मिती..
शेट्टींनी फेसबूकवर फुल उत्पादक शेतकऱ्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या फुलांमुळे देशातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे राजू शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी तातडीने पर्यावरण खात्याचे अतिरिक्त सचिव नरेश पाल गंगवार व सहसचिव सत्येंद्रकुमार यांना याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सुतोवाच केले होते.
कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ! रुग्णसंख्या 16 हजारांपेक्षा जास्त, विमानतळावर चाचणी होणार..
कोरोना लॉकडाऊन संकटानंतर देशाच्या बाजारपेठेत स्थिर स्थावर होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फुल उत्पादकांचा चीनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीने व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळे चायनीज प्लास्टिक फुले वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालण्यात यावी, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांनो आडसाली ऊस व्यवस्थापन...
वाढत्या मागणीने लिंबू दरात सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा
कडब्यास पाच हजार रुपयांवर दर, शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग..
Published on: 03 April 2023, 10:46 IST