सध्या राज्यांमध्ये जो काही सत्तासंघर्ष पाहायला मिळाला तेव्हा पासून राज्यात शिवसेना एकटी पडल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. त्यामुळे आता शिवसेनेची धुरा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः धरून महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा दोघे भाऊ एकत्र येणार का? कारण त्यांच्या एकत्र येण्यावर अगोदर देखील बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत.
एकदा तर राज ठाकरे यांनी त्या पद्धतीचा प्रयत्नदेखील करून पाहिला होता. या सगळ्या परिस्थितीत राज ठाकरे एक नवीन संधी म्हणून या सगळ्या राजकीय परस्थिती कडे पहाण्याच्या सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.उद्या राज ठाकरे राज्यातील मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेणार आहे.
तसेच महाराष्ट्र दौरा बाबत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना सांगितले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते की,
साद घातली तर येऊ देत.. मग बघू असं उत्तर त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आता दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या असून यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत राज ठाकरेच काय ते बोलतील.
नक्की वाचा:Agri News: बंधुंनो! बटाटा दरवाढी मागील 'हे' आहे पश्चिम बंगाल कनेक्शन,वाचा सविस्तर तपशील
Published on: 22 August 2022, 03:47 IST