News

रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याची सध्या बाजारपेठेत चांगली आवक सुरू असून हमीभाव केंद्रांवर देखील हरभऱ्याची खरेदी केली जात आहे.

Updated on 20 April, 2022 1:09 PM IST

रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याची सध्या बाजारपेठेत चांगली आवक सुरू असून हमीभाव केंद्रांवर देखील हरभऱ्याची खरेदी केली जात आहे.

बरेचदा शासकीय धान्य खरेदी केंद्रांवर देखील काही संस्थांची मक्तेदारी आणि मध्यस्थी होती. परंतु ही सगळी पद्धत मोडून महाएफपीसीने नवा पायंडा पाडला आहे. गेल्या दीडच महिन्यांमध्ये महाएफपीसीने हरभऱ्याचे तब्बल बारा लाख 50 हजार क्विंटल खरेदी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाफेड कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून तसेच त्यासोबत शेतकऱ्यांचे बिल वेळेत दिल्याने शेतकऱ्यांनी आता हरभरा विकण्यासाठी आपला मोर्चा खरेदी केंद्रांकडे वळवला आहे.

नक्की वाचा:कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा न विकता त्याची पेस्ट तयार करून विकले तर..?विचार करायला काय हरकत आहे!

महाएफपीसी स्थानिक गाव पातळीवर खरेदी केंद्राची उभारणी केल्यामुळे तसेच शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे वेळेत अदा केल्यामुळे हा बदल घडून आला आहे. त्यामुळे मिनी मार्केट समजल्या जाणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या खूपच महत्वाचे काम करत आहेत.

अगोदर नाफेडच्या माध्यमातून काही मोजक्याच कंपन्या या शेतीमालाची खरेदी करायच्या. परंतु या खरेदीमध्ये नियमितता  त्यासोबतच जास्त माल खरेदी करून घेण्याची क्षमता दिसत नसल्याने नाफेडने महाफार्मर प्रोड्युसर कंपनी ला हरभरा खरेदीचे काम दिले. त्यानुसार या कंपनीने गाव पातळीवर खरेदी केंद्र सुरू केले व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हरभऱ्याची खरेदी केली. यामुळे नाफेडच्या मालाच्या आवक मध्ये देखील वाढ झाली शिवाय शेतकऱ्यांना वेळेत मालाचे पैसे मिळाले. महाएफपीसीने राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये 288 खरेदी केंद्र उभारली होती. तसेच हरभरा खरेदी ची प्रक्रिया काय आहे याचा प्रचार आणि प्रसार देखील केला.

नक्की वाचा:कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, आजही तेल महागले का?

त्यामुळे या केंद्राकडे शेतकऱ्यांची गर्दी वाढतच गेली. 

आतापर्यंत विचार केला तर 66 हजार 275 शेतकऱ्यांचा तब्बल बारा लाख 50 हजार क्विंटल हरभरा खरेदी महाएफपीसीने केला आहे. अगोदर जशी बिल वेळेवर मिळत नाही या पद्धतीचे तक्रार कायम होती. परंतु आता अगदी दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत असल्यामुळे आणि एवढेच नाही तर ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे.

English Summary: mhafc purchasing 12 lakh 50 thousand chickpea at msp center
Published on: 20 April 2022, 01:09 IST