मराठवाड्यातील जनतेसाठी तसेच शेतकर्यांसाठी लवकरच अच्छे दिन येणार असल्याचे समजत आहे. कारण की कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. याबाबत माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, कृष्णा खोऱ्याचे पाणी भीमा स्थिरीकरण योजनेअंतर्गत मराठवाड्याला देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी सुमारे 23 टीएमसी पाणी आवश्यक आहे. यापैकी सुमारे सात टीएमसी पाणी उपलब्ध आहे मात्र उर्वरित पाण्यासाठी सरकार दरबारी अभ्यासाचे सत्र चालू असल्याचे समजत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 16.66 टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. याबाबत सरकार वेगवेगळ्या परिस्थितींचा अभ्यास करत आहे.
विधान परिषदेत चर्चेदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, टाटाच्या जलविद्युत प्रकल्प अंतर्गत वीज निर्मिती केल्यानंतर उर्वरित पाणी कोकणात सोडले जाते.
जवळपास वीज निर्मिती केल्यानंतर 42.50 टीएमसी पाणी कोकणात सोडले जाते. हे एवढे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करत भीमा खोऱ्यात उपलब्ध करून देता येईल का? याबाबत सरकार दरबारी अभ्यास सुरू आहे. यासाठी सरकारने सुर्वे समिती गठन केली आहे.
एकंदरीत सुर्वे समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाल्यानंतर याबाबत पुढील धोरण आखले जाणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. जर समितीचा अहवाल सकारात्मक असेल तर निश्चितच मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरी साठी ही एक मोठी सौगात सिद्ध होऊ शकते.
यामुळे मराठवाड्यात दुष्काळ भासणार नाही अशी आशा देखील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी समितीकडून सध्या अभ्यास सुरू आहे म्हणून आगामी काही दिवसात समिती अहवाल सादर करेल आणि त्यानंतर पुढील धोरण सरकार ठरवेल.
संबंधित बातम्या:-
Breaking News: कृषी विभागात घोटाळा! काँग्रेस नेत्यांनी केली 'इडी'कडे तक्रार
आनंदाची बातमी! बीएएसएफ कंपनीने ऊस आणि मका पिकासाठी लाँच केले कीटकनाशक वेसनिट कम्प्लिट
Published on: 25 March 2022, 08:46 IST