News

मराठा समाजासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या विद्यार्थांना आर्थिक मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा देणारा शासन निर्णय मॅटने अवैध ठरवला आहे. यामुळे आता मराठा समाज अजूनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Updated on 03 February, 2023 11:36 AM IST

मराठा समाजासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या विद्यार्थांना आर्थिक मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा देणारा शासन निर्णय मॅटने अवैध ठरवला आहे. यामुळे आता मराठा समाज अजूनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

याआधी मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर आर्थिकदृष्टया मागास आरक्षणाचा लाभ त्यांना मिळण्याची मुभा समाजाला होती. असे असताना आता मॅटच्या निर्णयाने एक मोठा फटका या समाजाला बसला आहे.

याबाबत माहिती अशी की, आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आव्हान देणाऱ्या एकूण 30 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.

दूधानंतर आता शेणालाही चांगले दिवस येणार! आता पेट्रोल-सीएनजीवर नाहीतर थेट शेणावर चालणार कार

त्यावर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सुनावणी पू्र्ण केली आहे. घटनापीठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला असून यावर आता अंतिम निकाल देण्यात आला आहे. हा राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा धक्का मानला जात आहे.

पपईच्या हायब्रीड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या कसे..

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर हा दुसरा मोठा धक्का मराठा समाजाला मिळाला आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! या गाई एका वर्षात देणार तब्बल 17 हजार 500 लीटर दूध, आता दुधाचा दुष्काळच हटणार..
साखर कारखान्यांचे डिजीटल करण्याचे धोरण अजून अंमलात आले नाही, मग डिजीटल क्रांती काय येणार?
कापूस, सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता, दर वाढीसाठी सध्या पोषक स्थिती

English Summary: Maratha community, permission apply Economically Backward Section illegal..
Published on: 03 February 2023, 11:36 IST