News

भारतात शेतकरी बांधव मान्सूनची आतुरतेने (Mansoon 2022) वाट पाहत असतात. कारण की भारतीय शेती (Indian Farming) ही सर्वस्वी पावसावर आधारीत आहे. मान्सून चांगला बरसला की शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील चांगली वाढ होते. यावर्षी देखील शेतकरी बांधव मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Updated on 13 May, 2022 6:05 PM IST

भारतात शेतकरी बांधव मान्सूनची आतुरतेने (Mansoon 2022) वाट पाहत असतात. कारण की भारतीय शेती (Indian Farming) ही सर्वस्वी पावसावर आधारीत आहे. मान्सून चांगला बरसला की शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील चांगली वाढ होते. यावर्षी देखील शेतकरी बांधव मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

राज्यातील शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी (Kharif Season) सध्या पूर्वमशागत करताना नजरेस पडत आहेत. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) या आधीच यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

बातमी कामाची! बारामाही मागणी असलेल्या या विदेशी फळाची शेती करा आणि कमवा बक्कळ; वाचा सविस्तर

भारतीय हवामान खात्यानुसार, यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे. तसेच हवामान अंदाज वर्तवणारे संस्था स्कायमेंटने (Skymet Weather Update) नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार या वर्षी मान्सून हा मुहूर्त साधनार असून वेळेत दाखल होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. स्कायमेंट नुसार, यावर्षी सरासरीपेक्षा 98 टक्के पाऊस पडणार आहे. यामुळे या वर्षी पीक पाणी चांगले येणार असल्याचा अंदाज आता कृषी क्षेत्रातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत. यावर्षी मान्सून हा वेळेत म्हणजेच एक जूनला दाखल होणार किंवा त्यापेक्षाही आधी मान्सून दाखल होणार असल्याचा स्कायमेंटने अंदाज वर्तवला आहे. 

खरं काय! ड्रीप इरिगेशनसाठी 'इतकं' मिळतं अनुदान; वाचा याविषयी

असानी चक्रीवादळमुळे मान्सून लवकरच

यादरम्यान, असनी चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन लवकर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनपूर्व पावसाचे केरळमध्ये जल्लोषात आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. स्कायमेंटच्या अंदाजानुसार यंदा केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन 26 मे दरम्यान केरळ मध्ये अपेक्षित आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुलले आहे. मान्सून आगमन यावर्षी चार ते पाच दिवस लवकर होणार असल्याचे संकेत आहेत.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' सरकारी योजनेमध्ये 95 रुपये गुंतवणूक करा आणि मिळवा तब्बल 14 लाख; वाचा याविषयी

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. विशेष म्हणजे 2003 मध्ये स्थापन झालेली ही संस्था आपल्या विश्वासाहर्ता साठी अधिक लोकप्रिय आहे. नेहमीच स्कायमेटचा अंदाज अचूक ठरतो आणि यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होतो.

English Summary: Mansoon 2022: Varun Raja will perform Muhurat this year; Rainfall will be above average this year too; Read Skymet's monsoon forecast
Published on: 13 May 2022, 06:05 IST