News

सध्या राज्यात सगळीकडे पावसाळा सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगबग सुरु आहे. तसेच खते बियाणे खरेदीसाठी देखील लगबग सुरु आहे. शिवाय मान्सूनच्या पुढील प्रवासास पोषक वातावरण असल्याचे देखील सांगितलं आहे. यादरम्यान, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचादेखील जून महिन्यातील मान्सूनचा अंदाज सार्वजनिक झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

Updated on 12 June, 2022 2:44 PM IST

सध्या राज्यात सगळीकडे पावसाळा सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगबग सुरु आहे. तसेच खते बियाणे खरेदीसाठी देखील लगबग सुरु आहे. हवामान विभागाने मान्सून काल मुंबईत (Monsoon News) दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय मान्सूनच्या पुढील प्रवासास पोषक वातावरण असल्याचे देखील सांगितलं आहे. यादरम्यान, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचादेखील जून महिन्यातील मान्सूनचा अंदाज सार्वजनिक झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

याबाबत आता पंजाबरावांनी 25 जून पर्यंतचा आपला मान्सून अंदाज (Panjabrao Dakh News) सार्वजनिक केला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या मते 11 जून म्हणजेच कालपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांचे देखील पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाकडे (Panjab Dakh Weather Report) लक्ष लागून होते.

यामुळे याचा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 11 जून पासून ते 15 जून पर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची (rain) शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. 16 आणि 17 या दोन दिवशी मराठवाड्यात अति मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. 22 तारखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडणार असल्याचे भाकित पंजाबराव डख यांनी वर्तवले आहे.

शेतकऱ्यांनो उसाची नोंदणी झाली नसेल तर काळजी करू नका, साखर आयुक्तालयाने घेतला मोठा निर्णय

यामुळे 18 ते 22 तारखेपर्यंत राज्यातील शेतकरी बांधव आपली पेरणीची कामे उरकून घेतील, असेही ते म्हणाले. शेतकरी बांधवांनी जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी. पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी केल्यास शेतकरी बांधवांच्या अंगलट येऊ शकते आणि हजारो रुपयांचा खर्च होऊ शकतो. त्यांनी शेतकरी बांधवांना चांगले दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला दिला आहे. विद्यापीठाचे बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! आण्णा हजारे लवकरच करणार संघटनेची घोषणा? चर्चांना उधाण
घोडगंगाच्या मतदार यादीत मृत सभासदांची नावे, कारखान्याने सर्वे केलाच नाही
आता रेशनच्या दुकानातही मिळणार भाज्या आणि फळे, विक्रीला परवानगी

English Summary: Mansoon 2022: Punjabrao announces monsoon forecast June, important advice farmers
Published on: 12 June 2022, 02:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)