मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रद्द करत ठाकरेंना अनेक धक्के दिले. आता आणखी एक मोठा धक्का शिंदेचा ठाकरेंना दिला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. मात्र ही यादी रद्द करण्याची मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. शिंदेंनी आणखी एक धक्का दिला आहे.
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! माजी मुख्यमंत्री आणि 9 आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार..
मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं की, राज्यात आता सत्तांतर झालं आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांवर आता नवी नावं आपण देणार आहोत. त्यामुळे नावांची जुनी यादी रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.
फडणवीस आणि चव्हाणांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण; चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, ही भेट...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती.
पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदेंचं सरकार आता नवीन नावं सुचवणार आहेत.
मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार...
Published on: 03 September 2022, 09:54 IST