सध्या महावितरण आणि शेतकरी यांच्यात मोठा वाद सुरू आहे. याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना अंदाजे बिले दिली जात आहेत. बीड तालुक्यातील 12 हजार नागरिकांना रीडिंग न घेता अंदाजे जास्तीच्या वीज बिलाचा शॉक दिला जात (Mahavitran Poor administration) आहे.
यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खंडाळा गावातील नागरिकांनी आपली व्यथा मांडली ( huge electricity bill sent beed farmers ) आहे. अंधारात राहू तुमचे बिलही नको आणि लाईट नको अशी भावना ग्रामस्थांनी मांडली.
विजेची आकडे टाकून चोरी करणाऱ्या लोकांना मात्र महावितरणचे पाठबळ आहे. आम्ही तुमचे मिटर घेऊन चुक केलीय का असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. अनेकांच्या घरात अगदी कमी वीज वापरून देखील मोठ्या प्रमाणावर बिल आले आहे.
राज्यातील १२२ कारखान्यांनी एफआरपी थकविली, सरकार कारवाई करणार का?
घरात दोनच विजेचे बल्प आहेत. मात्र बिल 34,000 आले असल्याचे ग्रामस्थांनी ( Mahavitran cheat Poor farmers ) सांगितले. मजुरी करणाऱ्या कुटुंबाने एवढे मोठे बील भरायचे कसे असाच प्रश्न आता त्या नागरिकांपुढे आहे.
रंगीबेरंगी फुलकोबीच्या लागवडीत नफाच नफा, बदलणार शेतकऱ्यांचे नशीब!
मीटर रीडिंग न घेता तिरूपती नावाची कंपनी शहरात बसून रिडींग ( reading takers and contractors Collusion ) टाकते. त्यामुळे बिलाचे आकडे वाढत आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
काही महिन्यापूर्वीच तयार केलेला राज्य मार्ग ट्रॅक्टरने नांगरला, मी बीडीओ, मुलगा वकील असल्याची दिली धमकी
... तर शेतकरी आत्महत्या करणार नाही! बळीराजा आहे सर्वांचे भविष्य...
प्रक्रिया उद्योगांमध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर; भविष्यात मका लागवड ठरेल फायदेशीर
Published on: 10 January 2023, 09:48 IST