News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे अनेकदा अडचणीत निर्माण झाल्या आहेत. असे असताना आता महाराष्ट्र, तामिळनाडूसह 13 राज्यांना आता वीज खरेदी करता येणार नाही. पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने वीज पुरवठा करणाऱ्या इंडिया एनर्जी एक्सचेंज, पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज या कंपन्यांना 5 हजार कोटींहून जास्त वीज बिल थकित असलेल्या 13 राज्यांना वीज पुरवठा न करण्याचे आदेश दिले आहेत.

Updated on 20 August, 2022 11:04 AM IST

यामुळे आता वीज खरेदीसाठीचे इतर पर्याय शिधावे लागणार आहेत. या 13 राज्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.

या राज्यांनी पैसे थकवले आहेत. केंद्रीय वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोसोको या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीच्या आदेशामुळे आता या राज्यांना वीज खरेदी करता येणार नाही. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'जशा मुली 'बॉयफ्रेंड' बदलतात तसे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नवा पार्टनर निवडला आहे'

19 ऑगस्ट 2022 पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करावी, असे पत्र पाठवण्यात आले आहे. या राज्यांकडून जोपर्यंत थकित वीज भरली जात नाही तोपर्यंत त्यांचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करु नये असेही या पत्रात म्हटले आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.

65 हजार पगार असणाऱ्या RTO अधिकाऱ्याची संपत्ती बघून डोळे होतील पांढरे, 6 घरे, सिनेमा हॉल, रोख रक्कम, सोनं..

आता या राज्यांना वीज पुरवठा कमी होणार असून वीज तुटवड्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. सध्या ग्राहकांना जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर महावितरणकडून वाढ करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता कोणाकडे न्याय मागायचा? सरेंडर होण्यास सांगितलेला मंत्रीच बिहारमध्ये बनला कायदामंत्री
काय करायचे या भरमसाठ फी घेणाऱ्या खाजगी शाळेचे? फी न भरल्यामुळे शिक्षकाची विद्यार्थाला जबर मारहाण, विद्यार्थ्याचा मृत्यू..
आता वाढीव वीज बिलाची कटकटच मिटली! जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार

English Summary: Maharashtra will not be able to buy electricity!! 5000 crore action due to exhaustion
Published on: 20 August 2022, 11:04 IST