भारतीय हवामान खात्याने आज अर्थात बुधवारपासून महाराष्ट्रात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे तूर्तास महाराष्ट्रवासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हवामान खात्याच्या नुकत्याच जारी केलेल्या अंदाजानुसार 11 मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार आहे.
यामुळे या भागातील जनतेस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 11 आणि 12 मे दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाट कायम राहणार आहे. यामुळे विदर्भावर सूर्य देवाचा प्रकोप अजून काही काळ बघायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे, राजधानी मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, येत्या काही दिवसांत राज्यात संमिश्र प्रकारचे वातावरण राहणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहराचा आजचा हवामान अंदाज.
राजधानी मुंबई- आज बुधवार अर्थात 11 मे रोजी मुंबईत जास्तीत जास्त तापमान 34 आणि कमीत कमी तापमान 27 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभर राजधानी मुंबईत ढगाळ वातावरण बघायला मिळू शकणार आहे. निश्चितच दमट वातावरणामुळे राजधानी मुंबई घामाघूम होणार आहे.
पुणे- पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात आज 11 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 48 तर कमीत कमी तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राजधानी मुंबईप्रमाणेच सांस्कृतिक राजधानी पुणे येथे देखील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते.
नागपूर आजचा हवामान अंदाज: विदर्भातील प्रमुख शहर नागपूर मध्ये आज अर्थात 11 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 44 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 27 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. राजधानी मुंबई तसेच पुण्याप्रमाणेच नागपूर मध्ये देखील हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते.
नाशिक: पश्चिम महाराष्ट्रातील अजून एक प्रमुख शहर नाशिकमध्ये देखील आज जास्तीत जास्त तापमान 39 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाजभारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. याशिवाय आज नाशिक मध्ये पुणे मुंबई नागपूर प्रमाणेच ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.
औरंगाबादचा आजचा हवामान अंदाज: मराठवाड्यातील प्रमुख शहर औरंगाबादमध्ये आज 11 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 43 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 28 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला.
विशेष म्हणजे औरंगाबाद शहरात देखील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक प्रमाणेच हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.
Published on: 11 May 2022, 01:08 IST