News

Maharashtra Weather: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे काही नद्यांना पूर आले तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अजूनही महाराष्ट्रात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. हवामान खात्याने आणखी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही दिला आहे.

Updated on 17 August, 2022 4:41 PM IST

Maharashtra Weather: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा (Monsoon) जोर कायम असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही नद्यांना पूर आले तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अजूनही महाराष्ट्रात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. हवामान खात्याने (Department of Meteorology) आणखी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही दिला आहे.

महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुंबई हवामान केंद्राने बुधवारी यलो अलर्ट जारी केला आहे.

18 ऑगस्ट रोजी पुणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून त्यासाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्याच वेळी, 19 आणि 20 ऑगस्टसाठी हवामान खात्याने कोणताही इशारा जारी केलेला नाही.

मात्र, या काळात हलका पाऊस सुरू राहू शकतो. याआधी मंगळवारीही महाराष्ट्रात पाऊस सुरूच होता. संततधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम

त्याचवेळी राज्यात 1 जूनपासून अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 95 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच 300 हून अधिक गावांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे.

बुधवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

पुण्याचे आजचे हवामान

पुण्यात कमाल तापमान 28 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 50 वर नोंदवला गेला आहे.

मुंबईचे आजचे हवामान

बुधवारी मुंबईत कमाल तापमान 29 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 33 वर नोंदवला गेला आहे.

हिवाळ्यात या भाज्यांची लागवड करा आणि मिळवा बक्कळ पैसा; बाजारातही असते मागणी

नाशिकचे आजचे हवामान

नाशिकमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 38 आहे.

नागपूरचे हवामान

नागपुरात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 38 आहे, जो 'चांगल्या' श्रेणीत येतो.

औरंगाबाद हवामान

औरंगाबादमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 49 आहे.

महत्वाच्या बातम्या:
2 एकर शेतीतून 12 लाखांपर्यंत कमाई! किवी बनवणार शेतकऱ्यांना मालामाल
PM Kisan: पीएम किसान लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीसाठी सरकारने वाढवली मुदत

English Summary: Maharashtra Weather: Heavy rain continues in Maharashtra! (1)
Published on: 17 August 2022, 04:39 IST