News

यावर्षीच्या खरीप हंगाम झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळ जवळ महाराष्ट्रातील बऱ्याच भागात हातातून गेला आहे. जर आपण जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा जर विचार केला तर जवळजवळ या दोन महिन्यात 15 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे पाण्यात गेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा करावी व इतर मागण्यांसाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.

Updated on 19 August, 2022 7:32 PM IST

यावर्षीच्या खरीप हंगाम झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळ जवळ महाराष्ट्रातील बऱ्याच भागात हातातून गेला आहे. जर आपण जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा जर विचार केला तर जवळजवळ या दोन महिन्यात 15 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे पाण्यात गेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा करावी व इतर मागण्यांसाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.

परंतु या पार्श्‍वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे की, राज्यामध्ये ओला दुष्काळासारखे स्थिती नसून  त्यासाठी नियम देखील वेगळ्या पद्धतीचे आहेत.

नक्की वाचा:Market News: 'या' बाजार समितीमध्ये टोमॅटो लिलावाचा शुभारंभ,मिळाला चांगला भाव,वाचा तपशील

पण नेमके शेतकऱ्यांना द्यायच्या नुकसान भरपाई बाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले. एवढेच नाही तर येणाऱ्या दोन दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली जाणार असून त्या अनुषंगाने मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

तसेच शेतकऱ्यांना जी काही मदत करण्यात येणार आहे तिचे वितरण नेमके कधी पासून सुरू होणार याबाबत देखील मुख्यमंत्री,कृषिमंत्री सोमवारी सभागृहात घोषणा करणार असल्याचे देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

एकंदरीत त्यांच्या बोलण्याचा अर्थ पकडला तर नुकसान भरपाई बाबत जे काही स्पष्टता असेल ती शेतकऱ्यांना सोमवारीच कळेल असे चित्र आहे.

नक्की वाचा:"कर्ज काढा, पंतप्रधानांना भेटा, केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा"

 आता पहावी लागणार सोमवार पर्यंत वाट

 झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काही पीक व फळबागांचे नुकसान झाले, त्यामुळे संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधक हे अधिवेशनात करत असून तसेच 

शेतकऱ्यांना मदत किती केली जाईल याबाबत देखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबतची घोषणा सोमवारी केली जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात नेमकी कधी रक्कम जमा होणार याबाबत सांगितले जाणार असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

नक्की वाचा:Fish Farming: मत्स्यशेती घेईल आता उंच भरारी, देशात 'निलक्रांती' आणण्याच्या अभियानाला मंजुरी

English Summary: maharashtra state agriculture minister abdul sattar say about compansation package
Published on: 19 August 2022, 07:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)