गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत की कांद्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. जोपर्यंत नाफेडची कांदा खरेदी सुरू होती तोपर्यंत कांद्याचे भाव उत्तम नाही परंतु ठीक होते परंतु नाफेडने खरेदी बंद केल्यापासून पुन्हा कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
गेल्या एक महिन्यापासून कांद्याच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत असून जवळपास गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार केला तर 30 टक्क्यांपेक्षा अधिक कांद्याच्या किमती मध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा:भविष्यकाळ कापसासाठी 'गोल्डन' असेल का? शेतकऱ्यांना 'खुशी मिळेल कि गम',वाचा सविस्तर
कांदा दराच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केंद्र सरकार आता राज्य सरकारकडे करून देखील काही फायदा होत नसल्या कारणामुळे कांदा उत्पादक संघटनेने एक मोठा निर्णय किंवा इशारा दिला असून आता कांद्याला किमान पंचवीस रुपये किलो दर मिळावा अन्यथा 16 ऑगस्टपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा पुरवठाच बंद केला जाणार आहे. कांद्याच्या सततच्या घटत्या भावामुळे हा निर्णय संघटनेने घेतलेला आहे.
कांद्याच्या निर्यातीचा कांद्याच्या दरात फार मोठी भूमिका
कांदा निर्यातीच्या धोरणामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारचा अपेक्षित बदल केला नसून त्याचा परिणाम हा कांद्याचा दर घसरण यावर होतो.
कांद्याचे निर्यात व्यवस्थितपणे सुरू राहिली तर शेतकऱ्यांच्या कांद्याला व्यवस्थित दर मिळतो. परंतु कांदा निर्यातीच्या बाबतीत कुठलीही धोरणात बदल केला जात नसल्याने आणि एवढेच नाही तर कांदा निर्यातदारांसाठी केंद्र सरकारने जी 10 टक्के कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू केली होती तीदेखील गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे.
तसेच बाहेरच्या देशांमध्ये भारतीय कांद्याला फारशी मागणी नसल्याने देखील निर्यात घटत चालली आहे. त्यामुळे कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी केली जात असून वाढत्या उत्पादनाच्या तुलनेत चांगली बाजारपेठ आणि कांद्याला हमीभाव देण्याची देखील मागणी होत आहे.
Published on: 07 August 2022, 10:22 IST