News

दिल्लीत होत असलेल्या प्रदूषणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना आता महाराष्ट्रात देखील धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे चिंता वाढली आहे. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील उत्सर्जनामुळे महाराष्ट्रात वायू प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले असून, त्याची वाटचाल अतिधोकादायक पातळीकडे होत असल्याचा इशारा दिला आहे.

Updated on 08 November, 2022 10:29 AM IST

दिल्लीत होत असलेल्या प्रदूषणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना आता महाराष्ट्रात देखील धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे चिंता वाढली आहे. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील उत्सर्जनामुळे महाराष्ट्रात वायू प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले असून, त्याची वाटचाल अतिधोकादायक पातळीकडे होत असल्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र धोकादायक झोनमध्ये आहे. वाढत्या प्रदूषणामुळे राज्य अति धोकादायक वर्गवारीत जाण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये मृत्यूदर वाढण्याची, तसेच आयुर्मान कमी होण्याबरोबरच आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यामुळे यावर आताच पावले उचलली गेली पाहिजेत. नाहीतर येणाऱ्या काळात याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

यामध्ये प्रदूषित धूलीकणांमध्ये सागरी मीठ, धूळ, सल्फेट, ब्लॅक आणि ऑरगॅनिक कार्बन यांच्या अतिसूक्ष्म कणांचा समावेश असतो. श्वसनाद्वारे ते शरीरात गेल्यास मानवी आरोग्यास घातक असतात. यामुळे आरोग्यावर मोठे घातक परिणाम होणार आहेत. औष्णिक वीज निर्मिती केंद्रे, घन कचरा जाळणे व वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे राज्यातील एअरोसोल प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे.

NMNF पोर्टल लाँच: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून NMNF पोर्टल सुरू, शेतकऱ्यांना फायदा

महाराष्ट्रातील वायू प्रदूषणावर आतापर्यंत सर्वाधिक परिणाम हा कोळसाधारित वीज निर्मिती प्रकल्पांमुळे झाला आहे. प्रकल्पांची क्षमता वाढविणे सुरूच राहिले तर राज्याचा समावेश सर्वाधिक धोकादायक पातळीवर होईल. यामुळे याचा परिणाम हा वाढतच चालला आहे.

राज्यात होणार नव्याने स्वयंचलित हवामान केंद्रे, हवामानाची मिळणार अचूक माहिती...

औष्णिक वीज निर्मिती केंद्रे, घन कचरा जाळणे व वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे राज्यातील एअरोसोल प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे. कोलकाताच्या बोस इन्स्टिट्यूटच्या जाणकारांनी 'अ डीप इनसाइट इन टू स्टेट लेव्हल एअरोसोल पोल्युशन इन इंडिया' या शीर्षकाचा अभ्यास अहवाल प्रकाशित केला.

महत्वाच्या बातम्या;
घोडगंगा सहकारी कारखान्यात राष्ट्रवादीच्या पॅनलचे वर्चस्व, विरोधकांना धक्का
ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर गुन्हा दाखल
ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका वाहतूकदाराचा खून

English Summary: Maharashtra Delhi? danger zone, warning dust pollution
Published on: 08 November 2022, 10:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)