आपल्या देशात पिकांचे काही ठराविक हंगाम आहे त्या हंगामात च पिकांची लागवड करून काढणी केली जाते. या मद्ये रब्बी पिके , खरीप हंगामी पिके भुसार तसेच नगदी पीक यांचा समावेश असतो. रब्बी आणि हंगामी पिकांना बाजारात जास्त भाव मिळत नाही म्हणून त्यांना भुसार पिके सुद्धा म्हंटले जाते.
ऊस हे एक प्रकारचे नगदी पीक आहे त्यामुळे कमी वेळात जास्त नफा मिळवून देणारे हे पीक आहे. उसाबरोबरच कांदा, हळद, तंबाखू, कापूस ही सुद्धा नगदी पिके आहेत. साखर आयुक्तांनी एका मोबाईल ॲप्लिकेशन ची निर्मिती केली आहे. या ॲप च्या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्या उसाची नोंदणी क्षणार्धात करू शकतो. आणि यातून 200 साखर कारखान्यांना आपल्या ऊस नोंदणी ची माहिती जाणार आहे. या मुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
हेही वाचा:-NDDB ने जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर सांगितलेले घरगुती उपचार, वाचा सविस्तर
महा-ऊस नोंदणी मोबाईल ॲप्लिकेशन:-
हे ॲप आपण मोबाईल मद्ये प्लेस्टोर मधून डाऊनलोड करून घेऊ शकतो. या ॲप मुळे शेतकरी वर्ग आपल्या उसाची नोंदणी काही वेळातच करू शकणार आहे. यामुळे शेतकरी वर्गाचा त्रास यामुळे कमी होणार आहे. तसेच ॲप मुळे ऊस वेळेवर तुटण्यास मदत सुद्धा होणार असल्यामुळे यामधून शेतकरी वर्गाला चांगलाच फायदा होईल.
हेही वाचा:-इडिबल कोटिंग मुळे आता फळे -भाज्या राहणार दीर्घकाळ ताज्या, आयआयटी चे नवीन संशोधन
काय आहे हे ॲप, कसे वापरावे:-
या ॲप च्या मदतीने आपण उसांची नोंदणी घरबसल्या करू शकतो शिवाय उसाची नोंदणी ही 200 साखर कारखान्यांवर होणार आहे. हे ॲप प्ले स्टोर मधून डाऊनलोड करून घ्यावे, डाऊनलोड केल्यानंतर ओपन करून त्यामधे आपली माहिती भरून घ्यावी म्हणजेच गट क्रमांक, खातेदारच नाव, ऊस लागवडी खालील क्षेत्र अशी माहिती भरावी आणि ऊस नोंदणी साठी कारखाने सिलेक्ट करावे. त्यामुळे क्षणार्धात च आपल्या उसाची नोंदणी 100 सहकारी,100 खाजगी साखर कारखान्यांकडे होणार आहे.
Published on: 05 September 2022, 04:14 IST