News

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने चालू रहातील यांसारखे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र मराठवाड्यातदेखील दाखल करण्यात आले होते. असे एक ना अनेक उपाययोजना उपलब्ध करुन दिले असतानाही मराठवाडा विभागात सर्वाधिक ऊस शिल्लक आहे.

Updated on 03 June, 2022 5:17 PM IST

सध्या राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी ऊस तोडणीला होणारा विलंब यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. जून महिना उजाडला तरी उसाचा प्रश्न कायम आहे. राज्यातील साखर कारखाने सुरु आहेत मात्र ऊस तोडणीचे काम अद्यापही संपलेले नाही.

याबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने चालू रहातील यांसारखे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र मराठवाड्यातदेखील दाखल करण्यात आले होते. असे एक ना अनेक उपाययोजना उपलब्ध करुन दिले असतानाही मराठवाडा विभागात सर्वाधिक ऊस शिल्लक आहे.

असं असताना आता शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रामबाण उपाय सुचवला आहे. राजू शेट्टी यांचा शेती क्षेत्राबाबत गाढा अभ्यास आहे. त्यांनी अतिरिक्त उसाची पाहणी करून त्यावर मार्ग सुचवला आहे. 30 कारखान्यांनी जर दररोज 2 हजार टन प्रमाणे ऊस गाळप केला तरी 10 दिवसात हंगाम संपेल असा उपाय त्यांनी सुचवला आहे. मात्र या उपाय योजनेवर अंमलबजावणी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

धक्कादायक: ऊसाचे बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धक्काबुक्की

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न
यंदा मराठवाड्यात ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र या पिकाचा शेतकऱ्यांना म्हणावा त्या प्रमाणात फायदा झालेला नाही. याच कारण म्हणजे
ऊस लागवड करुन 20 महिने उलटले तरी अद्यापही उसाच्या तोडणीचे काम संपले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र मराठवाड्यातदेखील दाखल केले, तसेच अतिरिक्त उसाचे क्षेत्र किती आहे हे ठरवण्यासाठी समितीदेखील नेमण्यात आली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मात्र आता राजू शेट्टी यांनी सांगितलेल्या उपायाची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांचा प्रश्न काही अंशी मिटेल असं बोललं जात आहे.

अतिरिक्त उसावर राजू शेट्टी यांचा रामबाण उपाय
यंदाच्या अतिरिक्त उसामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचं आहे. कारण पावसाळा तोंडावर आला असताना ऊस फडातच असल्याने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होणार आहे शिवाय आगामी हंगामातील पिके घेणेही मुश्किल होणार आहे. यावर तोडगा म्हणून आता राजू शेट्टी यांनी रामबाण उपाय सुचवला आहे. "30 कारखान्यांनी रोज 2 हजार टनाचे गाळप केले तर 10 दिवसांमध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागू शकतो."

महत्वाच्या बातम्या:
भाजपच्या मैदानात राष्ट्रवादीची बाजी! सुनील आण्णांनी नाचून केला आनंद व्यक्त
मोठ्या मनाची कोंबडी; भर वादळात दिला मांजरीच्या पिल्लांना आसरा

English Summary: listen to the solution suggested by Raju Shetty; Important advice given on sugarcane sifting
Published on: 03 June 2022, 05:17 IST