News

कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर (Agriculutural product market committee chandwad) आमरण उपोषण सुरु केलं आहे.

Updated on 04 March, 2023 10:50 AM IST

कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर (Agriculutural product market committee chandwad) आमरण उपोषण सुरु केलं आहे.

यामुळे याकडे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना स्वेच्छा मरणाच्या मागणीचं पत्र शेतकऱ्यांनी लिहलं आहे. राज्यातील कांदाप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.

तसेच स्वेच्छा मरणासाठी चांदवडमधील शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. अधिवेशनात (Budget Session) कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं.

शेतकऱ्यांनो कोरडवाहू शेतीतील खर्च करा कमी, तुमचं बजेट करा तयार..

प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. अद्याप नाफेडकडून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नसल्याची स्थिती दिसत आहे. विरोधी पक्षांनी कांदा दराच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरलं होतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावं, नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु करावी.

धेनू ॲपच्या तंत्रामुळे फक्त एका तासातच विकली गाय, खरेदी विक्री झाली खूपच सोपी

तसेच कांद्याला चांगला दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करुन कांदा उत्पादकांना सहाय्य करावं अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान 600 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी किसान सभेने केली आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
100 म्हशी आणि 100 एकर जमीन! रामेश्वर मांडगेंनी करून दाखवलं
राज्यात गारपीटीची शक्यता, शेतकरी चिंतेत, काळजी घेण्याचे आवाहन
उत्पादक उपाशी, व्यापारी तुपाशी, कांद्याचा झालाय वांदा...

English Summary: Letter to the President for voluntary death! Farmers of Nashik go on hunger strike for onion.
Published on: 04 March 2023, 10:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)