राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांना (Farmers) पळो की सळो करून सोडले आहे. खरीप पिकांची (Kharip Crop) काढणी सुरु असतानाच ऐन वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकार चिन्हांतच व्यस्त असल्याचा आरोप करत परभणी (parbhani) मधील शेतकऱ्यांनी शेतात अर्धनग्न आंदोलन (agitation) केले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन (Soyabean) आणि कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
परभणीच्या मिरखेल (Mirkhel) येथील शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात आंदेलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेतात पाणी साठल्याने सोयाबीन खराब झाले आहे.
सुवर्णसंधी! दिवाळीच्या तोंडावर सोने 5700 रुपयांनी स्वस्त; पहा 14 ते 24 कॅरेटचे दर
यामुळे सरकारच लक्ष वेधण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या शेतामध्ये अर्धनग्न होत अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे. तसेच पीक विमा आणि सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडताना सांगितले की सोयाबीनचे पूर्ण शेत जलमय झालं आहे. या कृषी प्रधान देसात शेतकरी राजा आहे, असे सांगितले जाते की शेतकरी राजा आहे. मात्र, त्याला नावाला राजा ठेवले आहे. पण त्याचा जगण्याचा पूर्ण अधिकार या प्रशासकीय व्यवस्थेने हिरावला आहे.
त्यामुळे आम्ही आज अर्धनग्न अवस्थेत शासनाचा निषेध करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. आज भयानक स्थिती आहे. सोयाबीन कापणीची वेळ आली असताना पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.
आता आमची दिवाळी कशी होणार, शासन चिन्हात परेशान आहे. आमच्याकडे त्यांच लक्ष नाही. आम्हाला त्वरीत मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परभणीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
पीएम किसानच्या 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना धक्का; १२ व्या हफ्त्याचे पैसे अडकले; पहा तुमचे तर नाव नाही ना...
दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ; अमूलचा मोठा निर्णय
Published on: 15 October 2022, 06:21 IST